रत्नागिरी- रत्नेश्वर ग्रंथालयातर्फे २९५ जणांची नेत्रतपासणी
rat18p14.jpg-
78325
रत्नागिरी : धामणसे येथे श्री रत्नेश्वर ग्रंथालयातर्फे आयोजित नेत्रतपासणीवेळी मोफत चष्मे देताना उमेश कुळकर्णी.
------------
श्री रत्नेश्वर ग्रंथालयातर्फे
२९५ जणांची नेत्रतपासणी
सुवर्णमहोत्सव; १२३ जणांना दिले मोफत चष्मे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अहमदाबादच्या जोशी टेक्नॉलॉजी इंटरनॅशनलच्या सहकार्याने आणि नंदादीप नेत्रालयाच्यावतीने आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला. यामध्ये २९५ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. १२३ लोकांना मोफत चष्मे देण्यात आले.
ग्रंथालयाच्या स्व. डी. एम. जोशी सभागृहात हे शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी, सरपंच अमर रहाटे, कोनिका दत्त, गौरी चाफेकर, हृषिकेश मयेकर व ग्रंथालय संचालक, ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी कोनिका दत्त यांनी जोशी टेक्नॉलॉजीसोबत आपण दहा वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, यापुढेही धामणसे गावात विद्यार्थी, महिलांसाठी उपक्रम राबवू. श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे खूप कौतुक वाटते. एक ग्रंथालय गावच्या विकासासाठी असे उपक्रम राबवते, हे दुर्मीळ उदाहरण म्हणावे लागेल, असे सांगितले.
कार्यक्रमाला ऋतुजा कुळकर्णी, दीपक जाधव, विलास पांचाळ, मुकुंद जोशी, प्रशांत रहाटे, अनंत जाधव, विश्वास धनावडे, स्मिता कुलकर्णी, दीपक रेवाळे, केशव कुळकर्णी, अविनाश लोगडे, अन्वी वारशे आदी उपस्थित होते.
कोट
वाचनालयात वाचकांनी यावं, यासाठी असे विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. वर्षभर असे कार्यक्रम आयोजित करण्याचे आम्ही संचालक मंडळाने ठरवले आहे.
- उमेश कुळकर्णी, अध्यक्ष, रत्नेश्वर ग्रंथालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.