रत्नागिरीःफार्मर आयडीमध्ये चिपळूण तालुका आघाडीवर

रत्नागिरीःफार्मर आयडीमध्ये चिपळूण तालुका आघाडीवर

Published on

फार्मर आयडीमध्ये चिपळूण तालुका आघाडीवर
१ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना फार्मर आयडी; ३९ हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ः जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत १ लाख ७२ हजार ४५७ शेतकऱ्यांपैकी एक लाख ३३ हजार ३१५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. अद्याप ३९ हजार १४२ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी न केल्यामुळे शासनाच्या २० व्या हप्त्याला मुकावे लागणार आहे.
केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तर राज्यशासनाने २०२३-२४ पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंमलात आणली आहे; मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी महत्वपूर्ण आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ४५७ लाभार्थी ठरले आहेत. त्यापैकी १४ जुलैपर्यंत १ लाख ३३ हजार ३१५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी ३९ हजार १४२ शेतकऱ्यांनी नोंदणीच केली नसल्यामुळे त्यांना पीएम किसानच्या हप्त्याला मुकावे लागणार आहे. पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक कला आहे. जिल्ह्यात अॅग्रिस्टॅक नोंदणीमध्ये सर्वाधिक नोंदणी चिपळूणमधून करण्यात आली आहे. सर्वात कमी नोंदणी रत्नागिरी तालुक्यात झाली आहे. लाभार्थी संख्येपेक्षा फार्मर आयडी नोंदणी केलेल्यांची संख्या कमी आहे. पीएम किसान योजनाचा २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे; मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी बंधनकारक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी सांगितले.

चौकट
पीएम किसान अनुदानासाठी फार्मर आयडी नसलेले तालुक्यातील शेतकरी
मंडणगड - १५७२, दापोली-६०३०, खेड-३८३५, गुहागर ४०९५, चिपळूण-२० हजार २९७, संगमेश्वर-६१४१, रत्नागिरी- ८२२४, लांजा-१४७, राजापूर-४८२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com