राजापूर-राजापूर मच्छीमार्केटमध्ये मासेविक्रीचा निर्णय

राजापूर-राजापूर मच्छीमार्केटमध्ये मासेविक्रीचा निर्णय

Published on

rat18p23.jpg-
78400
राजापूर ः नगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीसाठी एकत्र आलेल्या मच्छीविक्रेत्या महिलांसमवेत स्वच्छतादूत महेश शिवलकर आणि आरोग्य विभागाचे अधिकारी.
----------------
राजापूर मार्केटमध्येच होणार मासे विक्री
पालिकेचा निर्णय; रस्त्यावर बसून विक्री नाही, विक्रेते सकारात्मक
राजापूर, ता. १९ : लाखो रुपये खर्च करून पालिकेने बांधलेल्या मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्री न करता काही मच्छी विक्रेत्या महिला छत्रपती शिवाजीपथ वा शहरातील काही भागामध्ये रस्त्यावर बसून मासेमारी करतात. त्यातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होताना काहीवेळा वाहतूककोंडीचीही समस्या निर्माण होते. रस्त्यावरील मासे विक्रीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये रविवारपासून (ता. २०) रस्त्यावर न बसता केवळ मच्छी मार्केटमध्येच मासेविक्री व्यवसाय करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला मच्छी विक्रेत्या महिलांनीही सकारात्मक प्रतिसाद देत पाठबळ दिले आहे.
शहराचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर तथा स्वच्छतादूत महेश शिवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगरपालिकेत झालेल्या या बैठकीला पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंता तथा आरोग्य विभागप्रमुख सुप्रिया पोतदार, आरोग्य विभागाचे अमित पोवार, स्वच्छता निरीक्षक सुशील यादव, मुकादम राजा जाधव आदी उपस्थित होते.
पालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरात मच्छी मार्केटची उभारणी केलेली असतानाही शहराच्या काही भागात तसेच छत्रपती शिवाजी महाराज पथ या ठिकाणी रस्त्यावर काही महिलांकडून मासे विक्री केली जात आहे. त्या ठिकाणी टाकण्यात येणारी घाण आणि पाण्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्याचवेळी छत्रपती शिवाजीपथ रस्त्यावर या मासे विक्रीमुळे अनेकवेळा वाहतूककोंडीही होते. त्यामुळे या ठिकाणी मासेविक्री करण्यास अटकाव करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे.
रस्त्यावरील मासे विक्रीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्‍नांबाबत स्वच्छतादूत शिवलकर यांनी मासे विक्रेत्या महिलांचे प्रबोधन करताना पालिकेने स्थानिक नागरिकांसाठी आखलेल्या नियमांचे तालुक्यातून अथवा बाहेरगावाहून आलेल्या कोणत्याही व्यावसायिकाला पालन करणे बंधनकारक असल्याची जाणीव करून दिली. त्याचवेळी सर्व विक्रेत्यांना समान न्याय असल्याची ग्वाहीही दिली. या वेळी मासे विक्रेत्या महिलांचेही म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यानंतर झालेल्या चर्चेला मासे विक्रेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना मच्छी मार्केटमध्ये मासेविक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे या वेळी निश्‍चित केले.

चौकट ः
प्रथम येणाऱ्यांना प्रथम जाग
मच्छी मार्केटमध्ये मासेविक्रीसाठी सर्वांना जागा मिळावी, या उद्देशाने जागांचे सीमांकन करताना गाळ्यामध्ये प्रतिदिन चाळीस रुपयांचा कर सर्वांसाठी ठेवलेला आहे. मच्छी मार्केटमध्ये दररोज सकाळच्यावेळी पहिल्यांदा मत्स्य विक्रीसाठी येणारी महिला अथवा विक्रेता प्रथम जागा घेतील. जवाहर चौक येथील पिकअप् शेडमध्ये मासे विक्रीकरिता असलेली भांडी ठेवू नये, याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. मच्छी मार्केटमधील मत्स्य विक्री करणाऱ्या महिलांना नियमांबाबत विक्रेते, नगरपालिकेचा संबंधित विभाग यांनी माहिती द्यावी, असे ठरवले.
---
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com