चोरलेली रिक्षा इचलकरंजीत सापडली
78402
चोरलेली रिक्षा इचलकरंजीत सापडली
दोघे ताब्यात; सिंधुदुर्ग पोलिसांची कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः माडखोल-धवडकी येथून मध्यरात्री घराबाहेरून चोरलेली तीन आसनी रिक्षा सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत इचलकरंजी येथून हस्तगत करत दोघांना ताब्यात घेतले. महम्मद रफीक सलीम मुल्ला (वय ३९) आणि संजय भूपाल पोवार (वय २५, दोन्ही रा. इचलकरंजी, खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धवडकी येथील गणपत मोहनशेट कोरगावकर (वय ४६) यांची रिक्षा (एमएच -०७ एस-५४८०) त्यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता. १५) रात्री घराबाहेर पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना रिक्षा जागेवर दिसली नाही. त्यानंतर त्यांनी तत्काळ सावंतवाडी पोलिस ठाण्यात रिक्षा चोरीची फिर्याद दिली. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. संशयितांनी १६ जुलैच्या मध्यरात्री १ ते पहाटे ६ च्या सुमारास ही रिक्षा चोरल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक मोहन दहीकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंबोली पोलिस दूरक्षेत्राचे अंमलदार दीपक शिंदे, मनीष शिंदे, लक्ष्मण काळे, राजेश नाईक, संतोष गलोले यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.
सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि बँक स्टेटमेंट यांसारख्या तांत्रिक बाबींचा कसून तपास केला. तपासादरम्यान रिक्षा इचलकरंजी येथे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस अंमलदार दीपक शिंदे व मनीष शिंदे यांनी घटनास्थळी जात संशयितांसह रिक्षा हस्तगत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार संतोष गलोले करत आहेत. पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे रिक्षामालकाला दिलासा मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.