चौदा फरारी गुन्हेगार, तर १७ हिस्ट्रीशिटर मिळाले
पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’
चौदा फरारी गुन्हेगार सापडले ; ८७२ वाहनांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता. १८) मध्यरात्री रत्नागिरी पोलिसदलाने अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवण्यात आले. या विशेष मोहिमेत जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक कारवाई करण्यात आली. १४ फरारी गुन्हेगारांपैकी १३ मिळून आले. २० हिस्ट्रीशिटरपैकी १७ सापडले. ८७२ वाहने आणि १७१६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
या ऑपरेशनमध्ये अपर पोलिस अधीक्षक बाबूराव महामुनी यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, चिपळूण उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, परिमंडळ पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह एकूण १० पोलिस निरीक्षक, ३३ साहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक आणि २८ पोलिस अंमलदार यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
या मोहिमेदरम्यान १६ फिक्स पॉईंट्स आणि ५ पेट्रोलिंग पथके तैनात करण्यात आली होती. जिल्ह्यात ३१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. ९१ मोटारवाहन केसेस नोंदवण्यात आल्या. १ केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला, जो चिपळूण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. १ अमली पदार्थसंदर्भात कारवाई करण्यात आली, जी रत्नागिरी शहर पोलिस ठाणे हद्दीत होती. ३ नॉनबेलेबल वॉरंट, ६ बेलेबल वॉरंट आणि १२ समन्स बजावण्यात आले. ८७२ वाहने आणि १७१६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. ६२ लॉज, ४६ हॉटेल्स आणि ११ धाबे तपासण्यात आले. १५ बँका, १७ एटीएम, ४४ मंदिरे, धर्मस्थळे आणि ३ लँडिंग पॉईंट्सची तपासणी करण्यात आली. या ऑल आउट ऑपरेशनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीवर चांगलाच वचक बसला असून, यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.