वेंगुर्लेत २६८ जणांची कर्करोग चिकित्सा

वेंगुर्लेत २६८ जणांची कर्करोग चिकित्सा

Published on

78487

वेंगुर्लेत २६८ जणांची कर्करोग चिकित्सा

उपजिल्हा रुग्णालयात शिबिर; अत्याधुनिक व्हॅनमार्फत आरोग्य जागृती

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १९ ः महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला रुग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्याधुनिक कर्करोग व्हॅनच्या माध्यमातून २६८ रुग्णांची मौखिक, गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी, स्क्रिनिंग आणि समुपदेशन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयोजित मोहिमेचा प्रारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते फीत कापून तर शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विष्णू परब, ठाकरे सेनेचे उपतालुका प्रमुख संजय गावडे, डॉ. संजीव लिंगवत, रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद बोवलेकर, वरिष्ठ अधिकारी राजेश घाटवळ, वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष अॅड. प्रथमेश नाईक, किरण कुबल, सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे, कार्मिस आल्मेडा, किरण खानोलकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अपर्णा बोधलेकर, वृंदा गवंडळकर, आकांक्षा परब आदी उपस्थित होते.
डॉ. एच. के. मणेर, डॉ. गणेश मर्डेकर, ऋचा प्रभू, योगेश कांबळे, राजेश पारधी, संतोष खानविलकर, रजत जोशी, नेहा पडते, शिल्पा दळवी, महादेव हिंगले, सुनील धोपावकर यांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. निखिल बोड्डावार, परिसेविका श्रीनिधी घाटवळ, डॉ. अमोल गबाळे, डॉ. शुभम धारगळकर, डॉ. किरण कुंटे, डॉ. निखिला बेडावार, डॉ. सत्यम आगलावे, फार्मसी अधिकारी दिनेश राणे, प्राजक्ता मोरजकर, मंगल पवार, प्रियांका कारीवडेकर, समिक्षा पारकर, अस्मिता वराडकर, फार्मसी अधिकारी अनुजा मोरे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे डॉ. सुप्रिया रावळ, डॉ. महोदव मुंडे, श्याम चव्हाण, संजना मोचेमाडकर, तनुश्री नाईक यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले.
..................
सक्षम आरोग्य यंत्रणेसाठी प्रयत्न
जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य सुविधा मिळण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. याचाच एक प्रयत्न म्हणून कर्करोगावर निदान करण्यासाठी ही व्हॅन संपूर्ण जिल्ह्यात दाखल झाली आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर यावर उपचार करण्यासाठी डेरवण येथील रुग्णालयात सरकारतर्फे उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी सातत्याने पालकमंत्री, आमदार प्रयत्न करत आहेत. पुढील काळात जिल्ह्यात आरोग्याच्या दृष्टीने सर्व योग्य न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही श्री. वालावलकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com