-उमेदच्या माध्यमातून जनसुविधेला प्रोत्साहन

-उमेदच्या माध्यमातून जनसुविधेला प्रोत्साहन

Published on

-Rat१९p८.jpg -
P२५N७८४८५
भिंगळोली ः उमेदच्या माध्यमातून जनसुविधा केंद्र झेरॉक्स सेंटरचे उद्‍घाटन करताना मान्यवर.
------
‘उमेद’कडून जनसुविधेला प्रोत्साहन
स्वयंसहाय्यता गटातून साहाय्य भिंगळोलीत झेरॉक्स सेंटर
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १९ ः उमेदच्या अभियानांतर्गत तालुक्यातील स्वयंसहाय्यता बचतगटातील महिलांना आर्थिक साहाय्य करून त्यांच्या माध्यमातून जनसुविधेला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. रमाई स्वयंसहाय्यता समुहामधील सदस्या विकी पवार यांचे आदर्श जनसुविधा केंद्र झेरॉक्स सेंटरचे उद्‍घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मंडणगड व पंचायत समिती मंडणगडअंतर्गत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या मंडणगड शाखेतून आर्थिक साहाय्य झाले. यासाठी उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक अमित सरमळकर यांनी विशेष प्रयत्न केले. उद्‍घाटनप्रसंगी बँक ऑफ बडोदा अधिकारी सुदीप शिंदे, उमेद अभियान सीआरपी शुभ्रा कदम उपस्थित होते.
शेती व गृहोद्योगात सक्रिय असणाऱ्या महिला आता मोठे प्रक्रिया उद्योग सुरू करू लागल्या आहेत. मसाले, हळद, खाद्यपदार्थ (चिवडा, लाडू, चकली, फरसाण इ.), काजू, कोकम, आंबा, भाजीपाला उत्पादन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, छोटी दुकाने, टेलरिंग व्यवसायाला उमेदच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवरून सहकार्य मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com