-कोतापूर, धाऊलवल्ली, पाणेरेत आढळली बारव, तलाव
-rat१९p१७.jpg-
२५N७८५२९
राजापूर ः पाणेरेतिठा येथे आढळलेली बारव.
-rat१९p१८.jpg-
२५N७८५३०
राजापूर ः तलाव
----------
कोतापूर, धाऊलवल्ली, पाणेरेत आढळली बारव
मध्ययुगीन कालखंड; जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ ः तालुक्यातील कोतापूर तिठा, धाउलवल्ली आणि पाणेरेतिठा परिसरात दोन बारव आणि एक तलाव आढळून आले आहेत. विनोद पवार यांना ही ठिकाणे आढळून आली असून, या शोधमोहिमेमध्ये त्यांना जगन्नाथ गुरव यांचे सहकार्य लाभले. ही बारव आणि तलाव मध्ययुगीन कालखंडातील असण्याची शक्यता असून, आदर्शवत जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे. त्याला पुणे येथील इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी दुजोरा दिला आहे.
तालुक्यातील राजापूर-धारतळे मार्गावरील कोतापूर तिठा येथे असणाऱ्या प्रवासीमार्ग निवाराशेडच्या मागच्या बाजूच्या जंगलमय भागामध्ये एक बारव (पायऱ्यांची विहीर) आढळून आली आहे. ही बारव पूर्ण कातळात खोदलेली असून, साधारण ५० ते ६० फूट खोल आहे. या बारवमध्ये एका बाजूने आतमध्ये उतरण्यासाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे उतरणाऱ्या पन्नास पायऱ्या आहेत. नंदा प्रकारातील ही बारव मध्ययुगातील जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना आहे. याच परिसरामध्ये सुमारे ५० ते ६० फूट लांब आणि २५ ते ३० फूट रूंदी असलेला धारतळे येथे तलाव असून, हा तलावही नंदा प्रकारातील असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज वर्तवला जात आहे. अलीकडच्या काळामध्ये या तलावाला कठडा बांधण्यात आला असून, या नव्या बांधकामामुळे या तलावाचे मूळ स्वरूप दिसून येत नसले तरी जवळ गेल्यावर खोदाईची व तत्कालीन बांधकाम शैली पाहायला मिळते. धारतळेपासून सुमारे पाच किमी अंतरावर पाणेरेफाटा येथेही नंदा प्रकारातील बारव आहे.
---
बारव म्हणजे काय
कुंड हा वास्तूप्रकाराचा आधारभूत घटक असून, या कुंडाच्यावर विशिष्ट पायऱ्या देऊन एक पटांगण सोपान टप्पा ठेवत. त्यानंतर दुसरा व तिसरा सोपान ठेवून झालेला विस्तार बारव स्थापत्यात पाहावयास मिळतो. एकात एक लहान होत जाणारे कुंड असे याचे स्वरूप असते. बारवेत विविध देवतांची स्थापना केलेली असते. त्यासाठी असलेली देवकोष्ठे सर्वात वरच्या सोपानावर स्वतंत्र अशी किंवा अगदी संरक्षक भिंतीत व प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजू ठेवतात. बारवेत चौरस हा आकार प्रामुख्याने असतो; मात्र, आयत व क्वचित अष्टकोनी आकारही पाहावयास मिळतात.
---
कोट
कोकणामध्ये बारव अस्तित्वात आहेत. त्याच्या स्थापत्याचे अनेक विविध प्रकार आहेत. त्यातील अनेक रचना कोकणामध्ये आढळून येतात. गावोगावची लोकसंस्कृती, एकात्मता आणि सामाजिक जीवन त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बारव. कोंढेतड येथील वापी व तडाग त्यानंतर कोतापूर, धारतळे व पाणेरेफाटा येथे आढळून आलेल्या बारव व तलाव मध्ययुगीन जलस्थापनेचे उत्तम उदाहरण आहे.
अनिल दुधाणे, इतिहास संशोधक, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.