उभादांडा शाळेस सर्वतोपरी सहकार्य

उभादांडा शाळेस सर्वतोपरी सहकार्य

Published on

78598

उभादांडा शाळेस सर्वतोपरी सहकार्य

मनीष दळवी; विद्यार्थी, शिक्षक गुणगौरव सोहळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १९ ः संघर्षातून पुढे येऊन यश मिळविले पाहिजे. ही जिद्द न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाच्या संस्थाचालकांसह इथल्या शिक्षकांतही दिसून येते. तीच प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेतल्यास यश निश्चित मिळेल. संस्थेने केलेल्या सगळ्या संघर्षाचे एक चांगले फलित त्यांना मिळवून देऊ, असे अभिवचन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उभादांडा येथे दिले.
न्यू एज्युकेशन सोसायटी उभादांडा संस्थेच्या उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी शिक्षक गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दळवी बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन वीरेंद्र कामत आडारकर, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, परबवाडा गावचे उपसरपंच पपू परब, संस्थेचे सेक्रेटरी रमेश नरसुले, मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, आत्माराम गावडे, शिक्षणतज्ज्ञ रमेश पिंगुळकर, राधाकृष्ण मांजरेकर, शिवराम आरोलकर, सुजित चमणकर, नीलेश मांजरेकर, दाजी नाईक आदी उपस्थित होते. दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धड घेणाऱ्या शिक्षकांचाही झाला.
अंकुश जाधव यांनी, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सदुपयोग करावा, दुरुपयोग करू नये. शिक्षकांच्या सल्ल्यानुसार शिक्षणात प्रगती करावी, असा सल्ला दिला. प्रास्ताविक मुख्याध्यापक वाळवेकर यांनी केले. शाळेचा शैक्षणिक आढावा श्री. बोडेकर यांनी घेतला. श्रीमती भिसे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती दिली. अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. वैभव खानोलकर यांनी मानले.
---
‘अधिक संघर्ष, तिथे यश निश्‍चित’
दळवी म्हणाले, ‘‘ज्या ठिकाणी अधिक संघर्ष असतो, त्या ठिकाणी चांगले यश, हे समीकरण आहे. खेळाचे मोठे मैदान नाही, रस्ता नीट नाही, तरीही न डगमगता येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेली सर्व विषयांतील प्रगती वाखाणण्याजोगी आहे. शाळेसाठी वरिष्ठांच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com