आवास योजनेत धामणसे, कोतवडे ग्रामपंचायत अव्वल

आवास योजनेत धामणसे, कोतवडे ग्रामपंचायत अव्वल

Published on

rat20p6.jpg-
78679
रत्नागिरी ः आवास योजनेतील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा सन्मान करताना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे.

आवास योजनेत धामणसे, कोतवडे प्रथम
चवे द्वितीय तर गोळप ग्रामपंचायत तृतीय; सीईओंच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायतींच्या श्रेणीत धामणसेने तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत कोतवडे ग्रामपंचायतीने रत्नागिरी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि ग्रामपंचायतींचा यांना सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणअंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार विजेते यशवंत गणपत शेलार (नेवरे), रत्नप्रभा उदय ढवळे (वेळवंड) तर इंदू लक्ष्मण कोळंबेकर (कोतवडे) यांचा गौरव करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या श्रेणीत धामणसे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये चवे आणि गोळप ग्रामपंचायतींला अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा मान कोतवडेने पटकाविला.
या योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींमध्ये कोतवडेने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावला असून गावखडी आणि निरूळ ग्रामपंचायतींना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजना-ग्रामीणअंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा पुरस्कार पावसला देण्यात आला.
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील ५० लाभार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि चावी देऊन सन्मानित करण्यात आला. गटविकास अधिकारी चेतन शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक व लाभार्थी उपस्थित होते.


चौकट
सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार
राज्य पुरस्कृत आवास योजना- ग्रामीणअंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार विजेत्यांमध्ये विश्वास लक्ष्मण फुटक (कुरतडे), संगीता बबन सावंत (वळके) तर उज्ज्वला रमेश सुतार (गावखडी) यांचा समावेश आहे. त्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com