गुहागर - गुहागरात 1266 पैकी फक्त 378 घरकुलाची कामे सुरू
rat२०p२१.jpg -
७८७३०
गुहागर ः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे बोलताना.
------------
गुहागरात १२६६ पैकी फक्त ३७८ घरकुलाची कामे सुरू
प्रधानमंत्री आवास योजना ; १०९ रद्द होण्याची शक्यता
गुहागर, ता. २० : केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी घेताना प्रधानमंत्री आवास योजनेवर अधिक भर दिला. गुहागर तालुक्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या १२६६ घरकुलांपैकी केवळ ३७८ घरकुलाची कामे सुरू आहेत; मात्र मंजूर झालेल्या घरकुलांपैकी १०९ लाभार्थ्यांना सहहिस्सादारांची सहमती नसल्याने ती रद्द होण्याची शक्यता आहे. २५ जुलैच्या आत किरकोळ त्रृटी दूर करून पूर्णत्वास जाणारी घरकुले तातडीने पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
कोतळूक येथील काजू प्रोसेसिंग युनिट, पापड उद्योग, काळसूर कौंढर येथील गांडूळ खतप्रकल्प यांची पाहणी करण्याबरोबर ग्रामपंचायत वरवेली, येथील शाळा व सौरऊर्जा प्रकल्पालाही भेट दिली. वरवेली येथील सौरऊर्जा प्रकल्पाबाबत शासकीय जागेची या प्रकल्पासाठी एप्रिलअखेर मान्यता मिळवली असून, जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे.
गुहागर पंचायत समिती सभागृहामध्ये प्रधानमंत्री आवास योजना याचा आढावा घेताना प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मंजूर कामे, प्रगतीपथावरची कामे त्याचबरोबर त्यांना कितवा हप्ता दिला या सर्वांची माहिती घेतली. यासह जलजीवनची तालुक्यातील ११२ योजनापैकी २६ योजनांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. दहा योजना अद्याप सुरू झालेल्या नाहीत. ४६ योजनांचे रिवाईज अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे.
चौकट
नोडल अधिकाऱ्यांना नाही जाणीव
काही नोडल अधिकाऱ्यांना आपलं नक्की काम कोणतं, याची जाणीव नसल्याचे समोर आले. कागदपत्र अपूर्ण असताना लाभार्थ्यांना मंजुरी कशी दिली, असाही सवाल केला गेला. यामुळे कामांना गती मिळण्यासाठी सर्वाधिक लक्ष देत सुरू असलेल्या कामांमध्ये ७१४ कामांना दुसरा हप्ता प्रलंबित असल्याचे समोर आले. ६७१ कामे अजूनही बांधकामाला सुरवात नाही तर ३७८ कामे सुरू आहेत.
--------------------------------
चौकट
जातीचा दाखला नसतानाही योजना
रमाई आवास योजनेतून ३२८ पैकी ४६ कामे अद्याप अपूर्ण आहेत. या योजनेमध्ये जागाच नाही त्याला लाभार्थ्यांना मंजुरी दिली तसेच मोदी आवास योजनेतील ५१२ मंजूर कामांपैकी २७० कामे अजून अपूर्ण आहेत तर २०७ कामे सेंटर लेवलला तर २१ कामे प्लिंथ लेवलला झाली असल्याचे समोर आले. जातीचा दाखला नाही त्यांनाही या योजना मंजूर झाल्याचे निदर्शनास आले.
-----------------------
चौकट
ग्रामस्थांना दूर ठेवण्याचे नियोजन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्यामध्ये ग्रामस्थ येणार नाहीत, याचे नियोजन करण्यात आले अशी शंका घेण्यास जागा आहे. केवळ प्रशासकीय कर्मचारी व अधिकारीच त्यांना भेटले. ग्रामस्थांनी कोणतीही तक्रार किंवा स्वतःचे म्हणणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत देऊ नये, याची प्रशासनाने खबरदारी घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.