रत्नागिरी- विद्यार्थ्यांनो सातत्याने नवनवीन शिकत राहा

रत्नागिरी- विद्यार्थ्यांनो सातत्याने नवनवीन शिकत राहा
Published on

rat20p३१.jpg-
78799
रत्नागिरी : फाटक हायस्कूलमध्ये सत्कार करण्यात आलेले गुणवंत विद्यार्थी आणि मागे उभे मार्गदर्शक शिक्षक, संस्था पदाधिकारी.
-----------
विद्यार्थ्यांनो नवनवीन शिकत राहा
डॉ. जोशी ः फाटक हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : विद्यार्थ्यांनो सातत्याने नवनवीन गोष्टी शिका. परीक्षा देत रहा. नक्की यशस्वी व्हाल, असा विश्वास शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. ऋषिकेश जोशी यांनी फाटक हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी काढले.
शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीतील २, पाचवी शिष्यवृत्ती १२, आठवी शिष्यवृत्ती १७, एनएमएमएस शिष्यवृत्ती ८, सारथी शिष्यवृत्ती १ अशा एकूण ४० विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने रोख रक्कम आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. संस्थेकडे देणगीदारांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून १६ हजार तसेच माजी मुख्याध्यापक आनंद पाटणकर यांनी दिलेल्या १४ हजार ५०० अशा एकूण ३० हजार ५०० रुपयांच्या रोख पारितोषिकांचे ४० विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली.
मंचावर दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परूळेकर, कार्याध्यक्षा ॲड. सुमिता भावे, उपाध्यक्ष प्रकाश सोहोनी, ॲड. विनय आंबुलकर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये, परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विनोद नारकर उपस्थित होते.
इयत्ता पाचवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक विनोद नारकर, प्रकाश कदम, गीताली शिवलकर यांचे तर उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रीती हातिसकर, अनिल आग्रे, इंद्रसिंग वळवी, निवेदिता कोपरकर आणि दाक्षायणी बोपर्डीकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाने आपण आनंदित झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन निवेदिता कोपरकर आणि सुनिता गावित यांनी केले. अनिल आग्रे यांनी आभार मानले.

चौकट
चित्रकलेत राज्यात मान
एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांचा शंभर टक्के निकाल लागला असून राज्यात इंटरमिजिएट परीक्षेत अश्मी होडे हीने ३० वी आणि प्रथम शिंदे याने ३३ वा येण्याचा मान पटकावला. त्यांना दिलीप भातडे आणि निलेश पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com