हळवल, शिरवल, कळसुलीत गव्यांची दहशत ः फर्नांडिस

हळवल, शिरवल, कळसुलीत गव्यांची दहशत ः फर्नांडिस

Published on

हळवल, शिरवल, कळसुलीत
गव्यांची दहशत ः फर्नांडिस

कणकवली, ता. २१ : ‘हळवल, शिरवल, कळसुली (ता. कणकवली) मार्गावरील वामनवाफा परिसरात गव्यांचा दिवसरात्र वावर आहे. या गव्यांचे वाहन चालकांना सातत्‍याने दर्शन होत आहे. यात अनेक दुचाकीस्वार गव्यांना पाहून वेगाने वाहने हाकतात. त्‍यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. वनविभागाने तातडीने गव्यांचा बंदोबस्त करावा,’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुझाय फर्नांडिस यांनी केली.
श्री. फर्नांडिस यांनी वनविभागाला दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे, ‘कळसुली मार्गावर अनेक गावे जोडली गेली आहेत. या रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहनांची रहदारी असते. यातील वामनवाफा येथे शिरवल, हळवल गावात गवे कळपाने ये-जा करत असल्याने वाहन चालकांसह शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. वामनवाफा येथील धोकादायक वळणावर अचानक गवे समोर येत असल्‍याने वाहन चालकांचा गोंधळ उडत आहे. तेव्हा वनविभागाने या वळणावर वन्य प्राण्याचा वावर असल्याचा सूचना फलक लावावा, जेणेकरून वाहन चालकांना अंदाज येऊ शकतो, अशीही मागणी आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com