कुरंगावणे-मांजरेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था

कुरंगावणे-मांजरेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था

Published on

78971
78972
नडगिवे ः येथील मार्गावरील कुरंगवणे मांजरेकरवाडीकडे जाणारा रस्ता खोदला आहे. दुसऱ्या छायाचित्रात तयार केलेला पर्यायी रस्ता वाहून गेला आहे.


ग्रामपंचायत मालकीचा रस्ता जेसीबीने उखडला

व्यावसायिकाचा पराक्रम; कुरंगवणे-मांजरेकरवाडी मार्गाची दुर्दशा

सकाळ वृत्तसेवा
खारेपाटण, ता. २१ ः कुरंगवणे मांजरेकरवाडीकडे (ता. कणकवली) जाणाऱ्या नडगिवे मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता एका खासगी व्यावसायिकाने जेसीबीच्या सहाय्याने मूळ रस्ताच उखडून टाकल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. याप्रकरणी फणसगाव (ता. देवगड) येथील एका रहिवाशावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सरपंच संतोष ब्रह्मदंडे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
निवेदनात म्‍हटले आहे की, नडगिवे येथून मांजरेकरवाडीकडे जाणारा रस्ता ग्रामपंचायत मालकीचा आहे. त्याची ग्रामपंचायत दप्तरी अधिकृत नोंद आहे. सुमारे ३० वर्षांपासून या मार्गावरून रहदारी सुरू आहे. या मार्गाचा वापर केवळ मांजरेकरवाडीपुरता मर्यादित नसून इंग्लिश स्कूल, खारेपाटण, हसोळटेंब, कोंडवाडी, चिंचवली आणि खारेपाटण रोड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गासाठीही केला जातो. विशेषतः पूरस्थितीत हा रस्ता महत्त्वाचा ठरतो.
---
रस्त्याचे स्वरूपच बदलले
गत वर्षभरापासून संबंधिताने आपल्या खासगी क्षेत्रात बांधकाम सुरू केले आहे. यावेळी रस्त्याची तोडफोड करून त्याचे स्वरूप बदलले. माती व दगड टाकल्याने रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला आहे. पर्यायी रस्ता काढल्याचा दावा त्‍याने केला असला, तरी तो अरुंद व मातीचा असून विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बससाठी अत्यंत धोकादायक आहे. परिणामी चालकांना जीव धोक्यात घालून वाहने हाकावी लागत आहेत.
-----
कोट
ग्रामपंचायतीचा विरोध डावलून संबंधितांनी काम बेदरकारपणे सुरूच ठेवले आहे. याबाबत कुरंगवणे-बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहाय्यक अभियंत्यासह तहसीलदार, बिट अंमलदार आणि खारेपाटण पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. हा रस्ता पूर्ववत सुस्थितीत करून द्यावा, अशी मागणीही केली आहे.
- संतोष ब्रह्मदंडे, सरपंच, कुरंगवणे-बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com