महिलांच्या सेवेसाठी ‘इनरव्हील’ तत्पर

महिलांच्या सेवेसाठी ‘इनरव्हील’ तत्पर

Published on

78936

महिलांच्या सेवेसाठी ‘इनरव्हील’ तत्पर

मनिषा संकपाळ; कुडाळात वार्षिक पदग्रहण सोहळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः इनरव्हील क्लब ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या सेवेसाठी तत्पर असलेली संस्था आहे. या माध्यमातून महिलांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन वार्षिक पदग्रहण सोहळ्याप्रसंगी कोल्हापूर इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष मनिषा संकपाळ यांनी केले. यावेळी ‘सेवाज्योती बुलेटीन’चे प्रकाशन करण्यात आले.
कुडाळ इनरव्हील क्लबचा वार्षिक पदग्रहण कार्यक्रम येथील महालक्ष्मी हॉलमध्ये उत्साहात झाला. यावेळी कुडाळच्या मावळत्या अध्यक्षा संजना काणेकर, नूतन अध्यक्षा सानिका मदने, सचिव सई तेली, माजी प्रांत चेअरमन डॉ. सायली प्रभू, खजिनदार गितांजली कांदळगावकर, उपाध्यक्षा अनघा केसरकर, आयएसओ मेघा भोगटे आदींसह रोटरीचे उपप्रांतपाल सचिन मदने, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार, सचिव मकरंद नाईक, खजिनदार राकेश म्हाडदळकर, गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, प्रमोद भोगटे, राजेंद्र केसरकर आदी उपस्थित होते.
सौ. काणेकर यांनी कुडाळ इनरव्हील क्लबच्या २०२४-२५ या वर्षातील विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना सर्वांचे सहकार्य लाभल्याचे सांगून आभार व्यक्त केले. मेघा शिरसाट स्मृती पुरस्कार स्मिता शिरसाट यांना देण्यात आला. क्लबतर्फे यावर्षी गुरुवंदन पुरस्कार जिल्हा परिषद पोखरण शाळा क्र. १ च्या पदवीधर शिक्षिका शिल्पा राजाध्यक्ष यांना प्रदान केला. कुडाळ येथील डॉ. शिल्पा पवार यांना सदस्यत्व देण्यात आले. मधुरा नाईक (राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन सहभाग), भार्वी नाईक (कब बूलबुल विशेष प्राविण्य), डॉ. सुमेध सावंत व डॉ. समृद्धी सावंत (एमडीएस प्रवेश), वेदांत मदने (दहावी ९२.४०), गौरिश तेली (बारावी विज्ञान ८८ टक्के), गार्गी तेरसे (एसटीएस परीक्षा रजतपदक), क्रांती पवार (स्पर्धा परीक्षा), नील कांदळगावकर (आठवी शिष्यवृत्ती), अन्वी कांदळगावकर (एटीएस सुवर्णपदक) आदी गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात आला.
इनरव्हील ब्रँडींग वह्यांचे वितरण करण्यात आले. डॉ. उज्ज्वला सावंत, मनाली नाईक यांनी सूत्रसंचालन केले. सचिव तेली यांनी आभार मानले.
.......................
समाजोपयोगी उपक्रम राबवू
क्लबच्या माध्यमातून मैत्री व सेवाभावामधून वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्याचा मनोदय नूतन अध्यक्षा सानिका मदने यांनी व्यक्त केला. गरजू शालेय मूलींना सायकल वाटप, दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व कलचाचणी, गरजू महिलांना शिलाई मशीन, कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम, १००० फळझाडे वृक्षारोपण, ‘हॅपी स्कूल’ आदी उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com