मुंबई ग्राहक पेठ प्रदर्शनाला प्रतिसाद
rat२१p२३.jpg-
२५N७८९४७
रत्नागिरी : येथे आयोजित मुंबई ग्राहकपेठ प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा प्रतिसाद मिळत आहे.
‘मुंबई ग्राहकपेठ’ प्रदर्शनाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : मुंबई ग्राहकपेठेने पऱ्याची आळी येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या गृहोपयोगी व गृहसजावटीच्या व घरगुती वस्तूंच्या प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन येत्या गुरुवारपर्यंत (ता. २४) सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
गेली अनेक वर्षे मुंबई ग्राहकपेठ रत्नागिरी शहरात प्रदर्शन आयोजित करत आहे. मुंबईतील सुशिक्षित बेरोजगार व महिला लघुउद्योजकांनी तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. १००हून अधिक कंपन्यांच्या वस्तू येथे उपलब्ध असून, वस्तूचे प्रात्यक्षिक दाखवले जाते तसेच खरेदीवर भरघोस सवलतही दिली जात आहे. या प्रदर्शनात खादी शर्ट, फोल्डिंग गादी, सरबते, लोणची, ऑईल फ्री स्नॅक्स मेकर, पॉपकॉर्न मेकर, एका मिनिटात चपाती लाटून भाजून तयार, महाराष्ट्रीयन ज्वेलरी, वास्तुशास्त्र व मार्गदर्शन, किड्स वेअर, टॉईज आणि गेम्स, शैक्षणिक पुस्तके, सीडीज यांचा समावेश आहे तसेच विविध खाद्यपदार्थ, देवगड मालवणी मसाले, विविध प्रकारचे मुखवास विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पितळेची कढई, किचनओटा विळी, बॅग सीलिंग मशिन, जयपुरी कुर्ती, स्टोन ज्वेलरी, ड्रेस मटेरियल, ऑरिफ्लेम मसाले आणि भीमा शंकरची आयुर्वेदिक औषधेसुद्धा खरेदी करता येतील. २४ जुलैला रात्री ९ वाजता प्रदर्शनाची सांगता होणार आहे. रत्नागिरीकर ग्राहकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई ग्राहकपेठने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.