गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Published on

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
रत्नागिरी ः येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे तालुक्यातील उज्ज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे उत्साहात झाला. या कार्यक्रमाला स्मारक समितीचे अध्यक्ष एल. बी पवार होते. या वेळी मार्गदर्शन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांनी केले. गुणगौरव होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्मारक समितीच्यावतीने प्रशस्तीपत्र, भेटवस्तू आणि प्रवासखर्च प्रदान करण्यात आला. या वेळी लोकनेते बी. व्ही. पवार वाचनालयाला प्रा. बाबासाहेब कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके भेट दिली.

‘रास्तभावसाठी
अर्ज सादर करा’
मंडणगड ः मंडणगड तालुक्यात राजीनामा व अन्य कारणाने रिक्त असलेल्या सात गावातील रास्तभाव दुकानाकरिता ३१ जुलैअखेर तहसील कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. मंडणगड तालुक्यातील आंबवणे बुद्रुक, उंबरशेत, बोरखत, कांटे, वेसवी, वलौते, नारायणनगर या गावातील धान्य दुकान परवाना मंजुरीकरिता जाहीरनामे काढण्यात आले आहेत. संबंधित गावातील ग्रामपंचायत, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या संस्था व महिला स्वयंसहाय्यता बचतगट व महिला संस्था याकरिता तहसील कार्यालयात अर्जाचे दहा रुपये शुल्क भरून अर्ज सादर करू शकतात. परिपूर्ण कागदपत्रांसह दाखल झालेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार असून, मुदतीनंतर व अपुऱ्या कागदपत्रांसह प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

- rat२१p२०.jpg -
२५N७८९२५
शांभवी खोचरे

शांभवी खोचरे
सीए परीक्षा उत्तीर्ण
चिपळूण ः चिपळूण शहरातील कृष्णेश्वर नगर पाग येथील शांभवी खोचरे हिने सीए परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात चिपळूण शहरातील तीन विद्यार्थ्यांनी सीए होण्याचा बहुमान पटकावला आहे. खोचरे हिचे सीनिअर केजी ते दहावीपर्यंतचे शिक्षण ख्रिस्त ज्योती इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूण येथे झाले नंतर तिने पुणे येथील एस. पी. कॉलेजमधून वाणिज्य शाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पुणे येथील पी. एच. मेहेंदळे व चिपळूण येथील करमरकर नाईक अँड असोसिएट येथून प्रशिक्षण घेतले आहे.

‘हेमलता बुरटेंच्या रूपाने
सशक्त नेतृत्व हरपले’
चिपळूण : नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा, काँग्रेसच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या हेमलता बुरटेंच्या रूपाने एक सशक्त नेतृत्व हरपले, असे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले. दलवाई यांनी आज बुरटे यांच्या पार्थिवचे दर्शन घेतले. त्यानंतर दलवाई म्हणाले, बुरटे यांनी दोनवेळा चिपळूण नगरपालिकेच्या अध्यक्षा म्हणून अतिशय उत्तम काम केले आहे. नगराध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मवेळी तर अटीतटीच्या लढतीत शिवसेनेशी आघाडी करून काँग्रेसच्या नगराध्यक्षा म्हणून २००६ मध्ये विराजमान झाल्या होत्या. चिपळूणच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये बुरटे दाम्पत्याचे मोठे योगदान आहे. आक्रमक, अभ्यासू आणि निर्भीड व्यक्तीमत्त्व असलेल्या बुरटे यांनी अनेक हितकारक निर्णय आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात घेतले. त्यांच्या निधनाने चिपळूणमधील सामाजिक राजकीय क्षेत्राची हानी झाली आहे. एक सशक्त सामाजिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशी भावना दलवाई यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com