मंडणगड-घटनाकारांच्या तालुक्यात न्यायालयाची उभारणी

मंडणगड-घटनाकारांच्या तालुक्यात न्यायालयाची उभारणी

Published on

Rat21p9.jpg-
78917
मंडणगड : मंडणगड न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम वेगाने सुरू असून, ऑगस्टमध्ये लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
------
घटनाकारांच्या तालुक्यात न्यायालयाची उभारणी
पाच दशकांचे स्वप्न पूर्णत्वाकडे; न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामास वेग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २१ : मंडणगडवासीयांना संविधानिक न्यायिकदृष्टीने अभिप्रेत असणारे न्यायालय मंडणगड शहरात उभे राहत असून, या दिवाणी कनिष्ठ न्यायालयाच्‍या नवीन इमारतीचे बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे सुसज्ज न्यायालय बांधण्यात येत असल्याने त्याला विशेष महत्त्‍व प्राप्त झाले आहे.
तालुक्याच्या ठिकाणीच न्यायालय सुरू व्हावे, ही तालुक्याची पाच दशकांची मागणी होती. २ मार्च २०१४ ला तालुक्यात ग्रामन्यायालयाचा उपक्रम सुरू झाला. मात्र, कोविडच्या कालावधीत सुरक्षेच्या कारणाने लोकआग्रहाचा हा उपक्रमही बंद पडला. ८ ऑक्टोबर २०२३ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालायाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत मंडणगड येथे न्यायालयाच्‍या नवीन इमारतीचे भूमिपूजन व तात्पुरत्या स्वरूपातील जागेत न्यायालयाच्या नैमित्तिक कामकाजाला सुरुवात झाल्याने तालुक्याची गैरसोय दूर झाली. राज्यशासनाने नव्या इमारतीच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याने नव्या इमारतीच्या कामाला सुरुवात झाली. नियोजित वेळेत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष शासन व न्यायालयाने निर्धारित केले आहे.
इमारतीच्या कामाची जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून पाहणी करून आढावा घेतला जात आहे. जुलै २०२५ मध्ये सुमारे ९० टक्क्यांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. ऑगस्ट महिन्यात नव्या इमारतीच्‍या लोकार्पण सोहळ्यासाठी हालचाली सुरू आहेत.

चौकट
इमारतीची वैशिष्ट्ये : तळमजला व तीन मजले, दोन कोर्ट हॉल, प्रशासन, लॉकअप सुविधा, एटीएम, कॉन्फरन्स हॉल, न्यायाधीश कार्यालय, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, तीन लिफ्ट, स्वतंत्र जिने, बार असोसिएशन महिला व पुरुषांकरिता स्पेशल रुम्स. जिल्ह्यात अशा प्रकारचे नवीन डिझाईन असलेली पहिली इमारत असून, तालुक्यातील महत्त्‍वाची इमारत ठरणार आहे.

चौकट
डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा
न्यायालय इमारतीच्या परिरसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात येणार आहे, तसेच परिसराचे सौंदर्यीकरण होणार आहे. त्यासाठी क कोटी ४४ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com