मंडणगड-घरट्यांसाठी पक्षांची जंगली झाडांना पसंती
Rat21p7.jpg
78915
मंडणगड ः पाले येथील जंगली आईनाच्या उंच झाडावर नवरंग पक्ष्याने बांधलेले घरटे.
Rat21p8.jpg-
78916
लक्षवेधी सुरावटी आळविणारे नवरंग.
---------
घरट्यांसाठी पक्ष्यांची जंगली झाडांना पसंती
नवरंगाच्या सुरावटी लक्षवेधी; विणीचा हंगाम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २१ ः पावसाळ्यात निसर्गाने आपले सौंदर्य खुलवले आहे. पक्षीही त्याचा अविभाज्य भाग असून, यामध्ये पक्ष्यांनी आपले संसार थाटले आहेत. घरट्यांसाठी पक्ष्यांनी जंगली झाडांना सुरक्षित मानले असून, त्यावर आपले अधिवास बांधले आहेत. त्यातून पिल्लांचा जन्मोत्सव सुरू असून, झाडीझुडपातून शेतकऱ्यांना पावसाची चाहूल देणारा दुर्मीळ नवरंग पक्षी सुमधूर सुरावटी आळविताना मंत्रमुग्ध करतो आहे.
कोकणात विविध पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू आहे. घरट्यातील पिल्लांच्या संगोपनासाठी पक्ष्यांची धावपळ पाहणे, पक्षीप्रेमींसाठी सुवर्णसंधी आहे. जंगल परिसरातच नव्हे, तर घराशेजारील झाडांवर पक्ष्यांनी आपली घरटी बांधली आहेत. जुलै ते सप्टेंबर हा अनेक पक्ष्यांचा विणीचा काळ असतो. शेताच्या बांधालगत आईन, किंजळ, बोर, करवंद व रानभेंडीच्या झाडाच्या पानात, वाढलेल्या गवताला, झाडाझुडपांवर पक्ष्यांनी संसार उभे केले आहेत. सध्या त्यांचा विणीचा काळ सुरू असून, काही घरट्यातून अंडी, तर काहीतून चिमुकली पिल्ले दिसून येत आहेत.
पिल्लं आढळणारी घरटी ही बुलबुल, नवरंग, वटवट्या, हळद्या, चिमणी, खंड्या म्हणजेच धीवर पक्ष्यांची आहेत तसेच कृष्ण थिरथीरा, भारीट, खंड्या, भुरळी, हळद्या, मोर, चष्मेवाला, दुर्लव असे अनेक पक्षी दृष्टीस पडत आहेत. विविध प्रकारचे कीटक, किडे, मुंग्या पकडून आपल्या पिल्लांच्या चोचीत भरवताना त्यांचे कसब पाहणे अवर्णनीय असते. अन्य वन्यप्राणी, मोठे पक्षी यांच्याकडून घरट्यातील अंडी, पिल्ले खाण्याच्या घटना घडतात. वादळीवाऱ्यामुळे घरटी कोसळतात. त्यामुळे घरट्यातून यशस्वी भरारी घेणाऱ्या पक्ष्यांची संख्या खूपच कमी आहे.
चौकट
जंगलतोडीमुळे अधिवासावर संकट
जंगलतोडीमुळे पक्ष्यांच्या संख्येवर विपरित परिणाम जाणवू लागला आहे. पक्षी नैसर्गिक संकटांना तोंड देत स्थलांतर साधत असतात. घरटी बांधण्यासाठी सुरक्षित झाडे तोडीमुळे नष्ट करण्यात येत आहेत. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे त्यांच्या अधिवासावर दिवसेंदिवस गंडांतर आले आहे.
चौकट
नवरंगाला पोस्टाच्या तिकिटावर स्थान
तालुक्यात याला मोर, चिकल्या, बहिरा पाखरू, बहिरा, बंदी, गोळफा, खाटिक, नवरंग, पाउसपेव, पावशा या नावाने सुद्धा ओळखले जाते. संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी, कालावधीत दिसणाऱ्या या आकर्षक पक्ष्याने पोस्टाच्या तिकिटावरही मानाचे स्थान मिळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.