रत्नागिरी- टुडे पान १ साठी, संक्षिप्त
‘सिंधुरत्न टॅलेंट’ च्या
गुणवंतांचा गौरव
रत्नागिरीः युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहून टॅलेंट असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. समाजातील घटकांसाठी अशी कामे करणाऱ्या संस्था खूप कमी असतात, त्यापैकी ही संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विचार करून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यामागे मी खंबीरपणे उभा असल्याचे सामंत यांनी सांगितले.
-----------
करजगाव स्कूलमध्ये
जनजागृती कार्यक्रम
दापोली ः तालुक्यातील करजगाव येथील व्ही. के. जोशी हायस्कूल येथे अंमली पदार्थांचे दुष्परिणाम व हरित महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम उत्साहात झाला. मुख्याध्यापक सुनील जोशी यांनी अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. ए. एस. कोळेकर यांनी विशेष तयार केलेली माहितीपूर्ण चित्रफीत विद्यार्थ्यांसह पालकांना दाखवून जागृती केली. या वेळी एस. आर. कोकणे यांनी झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत वृक्षलागवडीचे महत्त्व सांगितले. शाळेच्या परिसरात चिंच, आवळा, पेरू, कोकमसारख्या झाडांची लागवड करण्यात आली.
-----------------------------------
ब्राह्मण सभेतर्फे
विविध कार्यक्रम
रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेतर्फे दीपअमावस्या व श्रावण मासारंभनिमित्ताने टिपऱ्या व भोवत्यांचा कार्यक्रम नाचणे येथील यशवंत हरी गोखले भवनाच्या सभागृहात आयोजित केला आहे. हा कार्यक्रम गुरूवारी (ता. २४) सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या वेळी विविध आणि आकर्षक दिव्यांची आरास केली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कोकाकोला ग्रुप (कोट, कोलधे, ता. लांजा) यांच्यावतीने टिपऱ्या आणि भोवत्यांचे बहारदार नृत्य सादर करण्यात येणार आहेत. रत्नागिरीकरांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी यशवंत गोखले भवनात उपस्थित राहावे, असे आवाहन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेमार्फत करण्यात आले आहे.
------------
जलतरण तलावाचा
पाणीपुरवठा सुरू
चिपळूण ः चिपलूण पालिकेच्या जलतरण तलावाचा पाणीपुरवठा अखेर सुरू झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी त्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल जलतरणपटूंनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले. शहरातील रामतीर्थ तलाव येथे चिपळूण पालिकेच्या मालकीचे जलतरण तलाव आहे. या तलावात पोहण्यासाठी नागरिक येत असतात; मात्र या तलावातील स्वच्छतागृहाचा पाणीपुरवठा मागील दोन महिन्यांपासून बंद होता. जलतरण तलाव चालवण्याचा ठेका खासगी एजन्सीला देण्यात आला आहे. या एजन्सीने पालिकेकडे पाण्याबाबत तक्रार केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जलतरण तलावाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, वस्तुस्थिती समजून घेतली आणि पालिकेकडे त्या संदर्भात पाठपुरावा केला. त्यामुळे पालिकेने तलावातील स्वच्छतागृहाचा पाणीपुरवठा सुरू केला आहे.
---------
चोरवणे, साखरमध्ये
सगुणा भातशेती
खेड ः युएनडीपी प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील चोरवणे, साखर, पोसरे, निवे या ४ गावांमध्ये एसआरआय पद्धतीने भातशेती लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिल्यानंतर चोरवणे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश शिंदे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी या पद्धतीने शेती करण्यास सहमती दर्शवली. संस्थेचे समीर चिकटे, सागर रणदिवे यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले. अन्य शेतकऱ्यांनी एसआरआय पद्धतीने भातशेती लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्याबाबत जनजागृती करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.