कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांबाबत आस्थाच नाही ः सावंत

कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांबाबत आस्थाच नाही ः सावंत

Published on

78988

‘शेतमालाला नाही हमीभाव,
शेतकऱ्यांनो खेळा रमीचा डाव’

सतीश सावंतांची कृषिमंत्र्यांवर टीका

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २१ : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांबद्दल कोणतीही आस्था नाही, विधिमंडळात ऑनलाईन रमीचा डाव खेळून ते ‘शेतमालाला नाही हमीभाव, शेतकऱ्यांनो खेळा रमीचा डाव’, असाच संदेश देत आहेत, अशी टीका ठाकरे शिवसेना पक्षाचे विधानसभा संघटक सतीश सावंत यांनी आज येथे केली.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेतील ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्यासह सरकारवर टीकेची झोड उठत आहे. श्री. सावंत यांनीही हा धागा पकडून त्यांच्यावर टीका केली. ते म्‍हणाले, ‘‘राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, फळ पीक विम्याचे पैसे दिले जात नाहीत, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांची अशी बिकट परिस्थिती आहे. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी कृषिमंत्र्यांनी प्रयत्‍न करायला हवेत. मात्र, कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांऐवजी रमीचा डाव महत्त्‍वा‍वाचा वाटत आहे. किंबहुना शेतकऱ्यांनीही आपला उदरनिर्वाह रमी खेळून करावा, असा संदेश ते देत आहेत.’’
सावंत पुढे म्हणाले की, ‘‘विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक विमा, हमीभाव आदी अनेक आश्‍वासने दिली. मात्र, यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. सरकारच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांमुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत प्रतिमेला धक्का बसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.’’ दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल भेट घेतली. त्यानंतर छावा संघटनेतील शेतकऱ्यांच्या मुलांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा आम्‍ही शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो, असे श्री. सावंत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com