आयडियल स्कूलमध्ये ‘श्रावणधारा’ स्पर्धा

आयडियल स्कूलमध्ये ‘श्रावणधारा’ स्पर्धा

Published on

आयडियल स्कूलमध्ये
‘श्रावणधारा’ स्पर्धा
कणकवली ः वरवडे (ता.कणकवली) येथील आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जिल्‍हास्तरीय ‘श्रावणधारा २०२५’ सुगम संगीत स्पर्धा आयोजित केली आहे. आयडियल स्कूल आणि डॉ. राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी १० ऑगस्ट रोजी होणार असून, अंतिम फेरी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकाला मराठी भावगीत, भक्‍तिगीत, गझल किंवा अभंग यापैकी कोणत्याही एका प्रकारात गीत सादर करता येणार आहे. गीत सादरीकरणासाठी ५ मिनिटे वेळ आहे. ही स्पर्धा पाचवी ते आठवी, नववी ते बारावी व खुला गट अशा तीन गटांत होणार आहे. तीनही गटांमध्ये प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही तसेच अंतिम फेरीवेळी आयोजकांमार्फत मोफत भोजन व्यवस्था केली जाणार आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी नाव नोंदणी ७ ऑगस्टपर्यंत करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-----
चेंदवण प्रशाळेत
संगीत प्रशिक्षण
कुडाळ ः श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे प्रथमच गायन व वादन प्रशिक्षण वर्ग बुधवारी (ता. २३) दुपारी २.३० वाजता सुरू होत आहे. हार्मोनियम शिक्षक योगेश प्रभू (संगीत विशारद, अलंकार अंतिम वर्ष) पखवाज वादक (शिक्षक), दत्तप्रसाद खडपकर (संगीत विशारद, अलंकार अंतिम वर्ष) या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‍घाटन श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे होणार आहे. वर्ग संगीत विशारदपर्यंत घेतले जातील. आजी व माजी विद्यार्थी आणि सर्व संगीतप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
...................
जामसंडेत आज
रक्तदान शिबिर
देवगड ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येथील देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नळपाणी योजनेच्या जलवाहिनी दुरुस्ती कामाचे भूमिपूजन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते उद्या (ता.२२) दुपारी १ वाजता जामसंडे वेळवाडी सडा भागातील साठवण टाकीजवळ होणार आहे. तत्पूर्वी भाजप देवगड मंडलातर्फे सकाळी ९ वाजता जामसंडे टिळक स्मारक येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. यावेळी सर्व संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
....................
मेढा काळबादेवीची
५ ऑगस्टला जत्रा
मालवण : शहरातील मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव ५ ऑगस्टला साजरा होणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काळबादेवी विश्वस्त मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com