-सावर्डे येथून ‘सक्षम तू’ अभियानाला शुभारंभ
-rat२१p३१.jpg -
२५N७८९८१
चिपळूण ः सावर्डे येथील ‘सक्षम तू’ विशेष अभियान कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी सभापती पूजा निकम.
-------
सावर्डेत ‘सक्षम तू’ अभियान सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी ‘सक्षम तू’ विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा प्रारंभ आमदार शेखर निकम आणि पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये करण्यात आला.
या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी सायबर गुन्हे किंवा संगणक गुन्हे, इंटरनेट वापरून केलेले गुन्हे यामध्ये विविध प्रकारच्या गुन्हेगारी जसे की, फसवणूक, ओळख, चोरी, डाटा चोरी आदींबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे लोकांचे पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड्स डिझेल्स मिळवणे व फसवणूक करणे, मोबाईल हॉकिंग करणे इत्यादींबाबतही मार्गदर्शन केले. ॲड. स्मिता कदम यांनी कायद्याबाबत म्हणजे समान वेतन कायदा, हिंदू विवाह कायदा महाराष्ट्र राज्य महिला आयोग या कायद्यांबाबत माहिती दिली. पूजा निकम यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.