खेड-बीड बससेवा सुरू
खेड-बीड बससेवा सुरू
खेड ः खेड-पुणे-बीड बससेवा गुरुवारपासून सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ही बस खेड स्थानकातून सायंकाळी ६ वाजता व बीडवरून दुपारी १.३० वा. सुटेल. महाड, माणगाव, मुळशी, पुणे, अहिल्यानगर, जामगे, पाटोदामार्गे बीडला जाईल. ऑनलाईन आरक्षणही खुले झाले असून, प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख रणजित राजेशिर्के, कोकण एसटीप्रेमी ग्रुपचे सहसंपर्कप्रमुख साहिल हुंबरे यांनी केले आहे.
खेड शहरात श्रमदान स्वच्छता मोहीम
खेड ः नगरपालिकेने ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत स्वच्छतामोहीम अधिक गतिमान केली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहर चकाचक ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असतानाच श्रमदानाची मोहीमही राबवण्यात येत आहे. शिवतररोड येथील सम्राट अशोकनगर येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी श्रमदान मोहीम राबवली. मुख्याधिकारी महादेव रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात येत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर शहर चकाचक ठेवले जात आहे.
खेडमध्ये ४ हजार ९५५ हेक्टरवर लावणी
खेड ः तालुक्यात पावसाच्या अनियमितपणामुळे भातलावणीला विलंब झाला; मात्र जुलै महिन्यात १५ दिवसांत पडलेल्या समाधानकारक पावसामुळे भातलावणीच्या कामांनी वेग घेतला. सद्यःस्थितीत ४९५५ हेक्टरवर भातलावणी पूर्णत्वास गेली आहे. शेतकरी अजूनही भातलावणीच्या कामात गुंतले आहेत. गेल्या १५-२० दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने भातलावणीच्या कामाने वेग घेतला आहे.
लोटेत आज रोजगार मेळावा
खेड ः कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मंगळवारी (ता. २२) सकाळी १० वाजता लोटे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशनमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात प्रामुख्याने कॉरटेव्हा क्रॉप इंडिया, एमईएसएम परशुराम हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, एक्सल इंडस्ट्रीज आणि घरडा केमिकल आस्थापनांचा समावेश आहे. या कंपन्यांनी विविध पदांसाठी ४५० मनुष्यबळाची मागणी नोंदवली आहे. त्यामुळे इच्छुकांनी बायोडाटा आणि इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.