समर्थ रंगभूमीतर्फे ४५ शाळांना शालेय साहित्य वाटप

समर्थ रंगभूमीतर्फे ४५ शाळांना शालेय साहित्य वाटप

Published on

-rat२१p३५.jpg-
२५N७८९९१
रत्नागिरी ः तरळव-बौद्धवाडी शाळेला साहित्य वाटपाच्यावेळी समर्थ रंगभूमी या नाट्यसंस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ.
---
समर्थ रंगभूमीतर्फे शालेय साहित्य वाटप
रत्नागिरी, ता. २१ ः येथील समर्थ रंगभूमीतर्फे सलग २२व्या वर्षी रत्नागिरी तालुक्यातील विविध ग्रामीण विभागातील होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार वह्या, कंपासपेट्या, रंगपेट्या, चित्रकला वह्या यांचे वाटप करण्यात आले तसेच शाळेच्या मागणीनुसार ड्रम सेट देण्यात आले. सलग बावीस वर्षात तालुक्यातील ४५ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
तालुक्यातील तरवळ-बौद्धवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक मोघे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी संस्थेचे रंगकर्मी मिलिंद सावंत, सुहास साळवी, चंद्रमोहन देसाई, जयदेव शिंदे आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com