नृत्य मल्हार कथ्थक अॅकॅडमीचा पुरीमध्ये नृत्य विजय

नृत्य मल्हार कथ्थक अॅकॅडमीचा पुरीमध्ये नृत्य विजय

Published on

-rat२१p६.jpg-
P२५N७८९१४
चिपळूण ः ओडिसा येथील सांस्कृतिक महोत्सवात विजयी झालेले कलाकार.
----
‘नृत्य मल्हार’चे धामपुरीमध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः जगन्नाथपुरी (ओडिसा) येथे आयोजित श्री जगन्नाथ धामपुरी उत्सव २०२५ या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक महोत्सवात चिपळूणच्या नृत्य मल्हार कथ्थक अॅकॅडमीने यश संपादन करत कोकणाच्या संस्कृतीचा झेंडा उंचावला आहे.
या प्रतिष्ठित महोत्सवाचे आयोजन कटक येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्र यांनी केले होते. महोत्सवात सहभागी झालेल्या विविध राज्यांतील आणि देशांतील नृत्यकलाकारांमध्ये चिपळूणच्या स्कंधा चितळे यांच्या नेतृत्वाखालील नृत्य मल्हार कथ्थक अॅकॅडमीने आपली वेगळी छाप पाडली. स्पर्धेत अॅकॅडमीच्या पाच विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. ओपन ग्रुप कॅटेगरीत संपूर्ण समूहाने विशेष पुरस्कार पटकावला. स्वामिनी सुर्वे हिने सबज्युनिअर सोलो कॅटेगरीत, आर्या जठार हिने ज्युनिअर सोलो प्रकारात, मानसी लिंगायत हिने सीनियर सोलोत तर आदिती आगवेकर हिने ओपन सोलो प्रकारात प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले.
या विद्यार्थिनींना चितळे यांचे मार्गदर्शन, नित्य सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण व नृत्यकलेतील अनुभव यामुळेच यशाचे शिखर गाठता आले, असे मत कलाविशारदांनी व्यक्त केले आहे. या यशानंतर नृत्य मल्हार कथ्थक अॅकॅडमीच्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर नृत्य सादरीकरणाची दारे खुली होतील, असा विश्वास चितळे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com