मोटार-दुचाकीच्या धडकेत सख्खे भाऊ जखमी

मोटार-दुचाकीच्या धडकेत सख्खे भाऊ जखमी

Published on

७८८८६

मोटार - दुचाकीच्या धडकेत
परचुरीचे सख्खे भाऊ जखमी
ःओझरखोल येथे अपघातांची मालिका सुरूच
संगमेश्वर, ता. २१ ः मुंबई-गोवा महामार्गावरील ओझरखोल ठिकाण अपघाताचे केंद्र बनले आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघाताची धूळ बसत नाही, तोच रविवारी (ता. २०) सायंकाळी ६ वाजता पुन्हा एकदा येथे दुचाकी आणि मोटारीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात परचुरी येथील दोन सख्खे भाऊ जखमी झाले. अथर्व चंद्रशेखर गुरव, शुभम चंद्रशेखर गुरव (परचुरी, ता. संगमेश्वर) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
अपघातानंतर स्वामी समर्थ अॅम्ब्युलन्सचे दीपेश राऊत यांनी संगमेश्वर येथे दाखल केले. जखमी दोघांवर प्राथमिक उपचार करून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मोटारचालक रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने निघाला होता. ओझरखोल येथे मोटारीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील अथर्व आणि शुभम जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना दीपेश राऊत यांनी अॅम्ब्युलन्सने त्वरित संगमेश्वर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चार दिवसांतच या ठिकाणी अपघात घडल्याने महामार्ग ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका वाहनचालकांना बसत आहे, असे बोलले जात आहे.

चुकीच्या ‘डायव्हर्जन’मुळे अपघात
मुंबई-गोवा महामार्गाचे काम दीर्घकाळापासून रखडले आहे. अनेक ठिकाणी महामार्गाची दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहन चालवणे अत्यंत धोकादायक बनले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी तर हा प्रवास जीवघेणा ठरत आहे. या परिस्थितीला सामोरे जात असतानाच कोणत्याही प्रकारचा अंदाज न घेता आणि वाहतूक नियमांची पर्वा न करता चुकीच्या पद्धतीने ‘डायव्हर्जन’ टाकल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. ओझरखोल येथील वारंवार होणारे अपघात हे नियोजनशून्यतेचा परिणाम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com