रानभाजी प्रदर्शनातून पारंपरिकतेचे दर्शन

रानभाजी प्रदर्शनातून पारंपरिकतेचे दर्शन

Published on

swt221.jpg
79143
शिडवणेः शाळा क्र. १ मध्ये आयोजित रानभाजी प्रदर्शनाची कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी पाहणी केली. सोबत रवींद्र जठार व इतर मान्यवर.

रानभाजी प्रदर्शनातून पारंपरिकतेचे दर्शन
शिडवणे शाळेत विक्री-प्रदर्शनः विद्यार्थी, पालकांचा उपक्रमास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २२ : निसर्गातील दुर्मीळ आणि पौष्टिक रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने शिडवणे क्र. १ शाळेत शनिवारी (ता. १९) रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि नैसर्गिक संपदेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते रानभाजी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, कणकवली पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुप्रिया पाष्टे, ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के, पोलिसपाटील समीर कुडतरकर, माजी अध्यक्ष दिनेश रांबाडे, उपाध्यक्ष संचिता टक्के, असलदे तावडेवाडीचे उपशिक्षक श्री. जंगले, गायत्री वाघरे, उर्मिला सुतार, अन्वी येतकर, मनाली धुमाळ, तारीफ शेख, अरविंद धाक्रस, रेशमी भोवड, गणेश पाष्टे, मंगेश सुतार, जान्हवी टक्के, मानसी रांबाडे, योगेश शिंदे, अर्चना पाष्टे, निशा कुडतरकर, सत्यवती वारीसे, प्रेरणा कासार्डेकर, स्नेहा पांचाळ, अर्चना भोवड, अनिल गुंडये, स्मिता पाष्टे, प्रवीण पाटणकर, सायली सुतार, नदीम शेख, शब्बीर शेख, कोमल वारीसे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी टाकळा, काटली, अळू, कुर्डू, अळंबी, माठ, शेवगा, भारंगी, केळफुल अशा विविध प्रकारच्या रानभाज्यांचे सुंदर सादरीकरण केले. प्रत्येक भाजीचे वैशिष्ट्य, त्याचे औषधी गुणधर्म आणि पारंपरिक उपयोग याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती दिली. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना केवळ रानभाज्यांची ओळख झाली नाही, तर त्यांच्यातील संशोधन वृत्ती आणि सादरीकरण कौशल्येही विकसित झाली.
या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी सीमा वरुणकर, हेमा वंजारी आणि समिता सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले. उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि पालक यांनी विद्यार्थ्यांच्या या रानभाज्यांच्या संकलन कार्यक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com