-पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
- rat२२p९.jpg-
P२५N७९१५६
रत्नागिरी ः पणनच्या मिलिंद जोशी यांचा गौरव करताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत. सोबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, आमदार किरण सामंत आदी.
---------------
हापूसला सुवर्णपदक देणाऱ्यांचा सन्मान
रत्नागिरीत कार्यक्रमाचे आयोजन ; पालकमंत्र्यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : एक जिल्हा एक उत्पादनात देशात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरला असून, हापूस आंब्याला सुवर्णपदकाचा मान मिळाला आहे. यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी आणि हापूस आंबाविक्रेते संघांनी प्रयत्न केले त्या सर्वांना प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी गौरव केला.
रत्नागिरीत झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा उद्योगकेंद्राचे माजी महाव्यवस्थापक प्रकाश हणबर, अजिंक्य आजगेकर, संकेत कदम, पणनचे मिलिंद जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, अमर देसाई, आनंद देसाई, श्रीकांत भिडे, विनोद हेगडे, शाहीद पिरजादे, अर्चना सकपाळ, आकाश म्हेत्रे, रवींद्र सूर्यवंशी, पूर्णांगी वायंगणकर, मुकुंद खांडेकर आदींना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी प्रमाणपत्र दिले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनीही जिल्ह्याच्या या यशाबद्दल पालकमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी राजापूरचे आमदार किरण सामंत देखील उपस्थित होते. तसेच लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना आणि जिल्हा परिषद सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तिपत्रांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार कायमस्वरूपी सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देणारा रत्नागिरी जिल्हा पहिला आहे. यानुसार अन्य पालिकांनी कार्यवाही करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.