नृत्यातून गुरुवंदना

नृत्यातून गुरुवंदना

Published on

-rat२१p२४.jpg-
OP२५N७८९५१
रत्नागिरी : नृत्यार्पणच्या भरतनाट्यम कार्यक्रमात सहभागी नर्तिका.
----
भरतनाट्यम् नृत्यातून गुरुवंदना
नृत्यार्पण नृत्य अकादमी ; लोवलेकर, मराठेंचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : नृत्यार्पण नृत्य अकादमीच्यावतीने गुरूपौर्णिमा अतिशय आगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. या वेळी गुरूपूजन, घुंगरूपूजन आणि भरतनाट्यमचे सादरीकरण करण्यात आले.
नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या संचालिका, गुरू प्रणाली तोडणकर- धुळप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. उद्‍घाटनप्रसंगी परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचे ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कदम, उदयोन्मुख गायक सतीश राठोड पाहुणे म्हणून आणि सुप्रिया तोडणकर, सिद्धेश धुळप आदी उपस्थित होते. सुरुवातीला नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या शिष्यांकडून गुरुपूजा आणि घुंगरूपूजा करण्यात आली. त्यानंतर नरतनाट्यमच्या विविध रचनांवर, अभंगावर आधारित नृत्य सादर केले.
या वेळी विशारद स्वरदा लोवलेकर आणि केतकी मराठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शैक्षणिक आणि भरतनाट्यमच्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या बिल्वा रानडे, श्रेया चव्हाण, भूमिका गुरव, भक्ती जोशी, तीर्थ वैद्य, आभा भाटवडेकर, ईश्वरी खाडीलकर, आदिती टिकेकर, वैदेही पाटकर, कल्याणी चव्हाण, प्रार्थना बोरकर, ओवी साळवी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात पावस, टिळक आळी आणि मारुती मंदिर शाखेतील विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com