आंबा बागायतदारांचे प्रश्न सोडवा
swt2212.jpg
79142
ओरोस ः पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत बागायतदार शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित होते.
आंबा बागायतदारांचे प्रश्न सोडवा
नीतेश राणेः शेतकरी, फळपीक विमा कंपनी प्रतिनिधीची एकत्रित बैठक
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ः पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत ओरोस येथे बागायतदार शेतकरी आणि फळपीक विमा कंपनीचे संबधित प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्त झालेल्या बैठकीत आंबा बागायतदारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. बागायतदारांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्या समस्यांची सोडणवूक झाली पाहिजे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी विमा कंपनी प्रतिनिधींना यावेळी केली.
येथील आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ यांच्या वतीने तालुकास्तरावर काढलेल्या शेतकरी मोर्चानंतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत पालकमंत्री राणे यांनी येथे बैठक घेऊन चर्चा केली होती. बागातयदार शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न आणि मागण्या समजून घेऊन याबाबत लवकरच फळपीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासित केले होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री राणे यांच्यासह जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अशोक सावंत, येथील आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास रुमडे, सचिव संकेत लब्दे, सहसचिव चंद्रकांत गोईम, इंद्रनील कर्वे, कुंदन गाडी, इमरान साटविलकर उपस्थित होते.
यावेळी रुमडे यांनी विविध समस्या मांडल्या. यामध्ये आंबा बोर्ड कार्यान्वित व्हावे, दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात कीड रोग व्यवस्थापनावर अद्ययावत संशोधन होऊन ते लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, रामेश्वर येथील फळ संशोधन उपकेंद्रातील प्रस्तावित प्रयोगशाळा प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा, पोट खराबा क्षेत्र लागवडीखाली दाखवून विमा कवचात समाविष्ट करावा, पीक पाहणी नवीन लागवडीसाठी ठेवावी, खते, कीटकनाशके जीएसटी मुक्त मिळावीत.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीएवढा परतावा विमा कंपनीकडून प्रत्यक्ष दिला जात नाही, त्यामुळे यामध्ये आवश्यक बदल व्हावा. २०२३-२४ चा तापमान व वारा यांचा परताव्याचा समावेश गतवर्षी नुकसान भरपाईमध्ये करण्यात आलेला नाही, तो परतावा मिळावा, १५ ते ३१ मे या कालावधीत यंदा अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे शेवटच्या टप्प्यातील आंब्याचे नुकसान झाले असून त्यापोटी शेतकऱ्यांना आवश्यक ती भरपाई मिळावी, आदी मागण्यांचा समावेश होता. याकडे फळपीक विमा कंपन्यांनी लक्ष देण्याची सूचना पालकमंत्री यांनी यावेळी केली.
चौकट
कोकण विभागासाठी स्वतंत्र निकष हवे
कोकणातील आंबा व्यवस्थापन ऑक्टोबरपासून जूनपर्यंत चालते. त्यामुळे विमा कालावधी १ ऑक्टोबर ते ३१ मे असा असावा. विमा कंपनीकडून नुकसान भरपाई परतावा मुदत संपल्यावर ४५ दिवसांत मिळावा. आता तो जुलैअखेरपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात यावा. फळपीक विम्याचे निकष हवामानातील बदलानुसार कोकण विभागासाठी स्वतंत्र असावेत, अशी मागणीही विलास रुमडे यांनी यावेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.