सिंधुदुर्गात ''भजन सदन'' उभारणार

सिंधुदुर्गात ''भजन सदन'' उभारणार

Published on

swt2223.jpg
79225
मसुरेः भजनी कलाकार संस्थेतर्फे आयोजित कार्यशाळेत मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

सिंधुदुर्गात ‘भजन सदन’ उभारणार
संतोष कानडेः मसुरेत भजनी कलाकार संस्थेतर्फे कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. २२ः भजनी कलाकारांना न्याय मिळावा तसेच भजन कला अधिक संपन्न व्हावी, कोकणचा हा वारसा टिकून राहावा, यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. भजन कलाकारांना शासन स्तरावर न्याय मिळवून देण्यात येईल. जिल्ह्यात भजन सदन होण्यासाठी पालकमंत्री नीतेश राणेंकडे मागणी केली आहे. प्रत्येक कलाकाराने संस्थेचा सभासद होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी मसुरे येथे केले.
भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गच्या वतीने मालवण तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन संस्थाध्यक्ष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे मर्डे येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक डॉ. दीपक परब, कामगार नेते प्रकाश परब, कलाकार मानधन समिती सदस्य अजिंक्य पाताडे, सचिव गोपीनाथ लाड, वैभव खानोलकर, सदानंद कसालकर, संतोष मिराशी, योगेश सामंत, तुळशीदास बागवे, संतोष पाताडे, संतोष मसुरकर, मकरंद सावंत, दाजी बांदकर, संजय चव्हाण, बाबाजी भोगले, महेश पालव, सतीश रावराणे, नामदेव गिरकर, पंढरीनाथ मसुरकर, राजेश गावकर आदी उपस्थित होते.
डॉ. परब यांनी, भजन गणपतीपुरते राहू नये. २०-२० डबलबारी भजनामध्ये काही ठिकाणी चुकीचे प्रकार होत आहेत. याला निर्बंध बसणे गरजेचे आहे. भजन ही पारंपारिक कला जोपासण्यासाठी लवकरच मसुरे गावात भजन महोत्सव आयोजित करण्यात येईल, असे सांगितले. प्रकाश परब यांनी संस्थेसाठी सभागृह व इतर सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. वैभव खानोलकर, अजिंक्य पाताडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रकाश परब, डॉ. दीपक परब, सामाजिक कार्यकर्ते बाबाजी भोगले, मसुरे देवस्थानचे प्रमुख मानकरी राजू प्रभूगावकर यांचा गौरव करण्यात आला. सचिव गोपीनाथ लाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बाबू आंगणे यांनी केले. या कार्यशाळेसाठी भरतगड इंग्लिश मीडियमचे सभागृह या संस्थेचे अध्यक्ष परब यांनी उपलब्ध करून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com