एनएसएस विद्यार्थ्यांनी केली भातलावणी

एनएसएस विद्यार्थ्यांनी केली भातलावणी

Published on

-rat२२p४.jpg-
२५N७९१२९
पावस ः जांभूळआड येथील शेतकरी जयंत फडके यांच्या शेतामध्ये भातरोपांची लावणी करताना अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे एनएसएसचे विद्यार्थी.
-----
‘अभ्यंकर’च्या विद्यार्थ्यांनी केली भातलावणी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २२ : रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी जांभूळआड, पूर्णगड येथील प्रगतीशील शेतकरी जयंत फडके यांच्या शेतात भातलावणी उपक्रम राबवला.
या उपक्रमात ४० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भातरोपांची लावणी केली. शेतमजुरांच्या समस्यांची जाणीव होण्यासाठी व श्रमाचे महत्त्व समजून घेण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी श्रमदान करत शेतकऱ्यांना मदत केली व पर्यावरण व शेतीचे महत्त्व समजावले. विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व आणि एनएसएसमधून माणूस कसा घडतो, कॉलेज जीवन जरी संपले तरी आपल्याला एनएसएसमधून मिळणारे संस्कार, माणुसकीची भावना ही जपता आलीच पाहिजे, असे विचार विद्यार्थ्यांशी संवाद साधताना फडके यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com