देवगडचा पाणीप्रश्न निकाली काढू

देवगडचा पाणीप्रश्न निकाली काढू

Published on

79239


देवगडचा पाणीप्रश्न निकाली काढू

पालकमंत्री नीतेश राणे; दहिबाव योजनेच्या दुरुस्तीचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ : येथील देवगड-जामसंडे शहरातील नागरिकांना सातत्याने भेडसावणारा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी लक्ष घालू. पाण्यासंदर्भातील शहरातील नागरिकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी प्रयत्न राहतील, असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे आश्‍वासित केले. आताच्या नळयोजना दुरुस्ती कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ दोन तासांत मंजुरी दिली, यावरून राज्यातील महायुतीचे सरकार गतिमान असल्याचे लक्षात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान २०२५-२६ योजनेंतर्गत देवगड जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील दहिबाव येथील अन्नपूर्णा नदीवरील उद्‌भवावरील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन पालकमंत्री राणे यांच्या उपस्थितीत झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, बाळ खडपे यांच्यासह अन्य मंचावर उपस्थित होते. यावेळी प्र. शि. मालवणकर यांच्यासह ठेकेदार प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. नगरसेवकांच्या वतीने पालकमंत्री राणे यांचा सत्कार झाला.
पालकमंत्री म्हणाले, ‘शहराचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रयत्न आहेत. स्थानिक नागरिकांचे समाधान झाले पाहिजे. तूर्त दुरुस्ती कामामधून बरेच प्रश्‍न निकाली निघतील. यासाठी योजनेचे काम दर्जेदार आणि वेळेत कसे पूर्ण होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. योजनेच्या दुरुस्ती कामाच्या प्रस्तावाबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगताच त्यांनी तातडीने फाईल मागवून घेऊन केवळ दोन तासांत त्याला मंजुरी दिली. येथील शहर आदर्श बनविण्यासाठी आपले प्रयत्न राहतील.’
अ‍ॅड. गोगटे यांनी, सद्यस्थितीत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमुळे नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल. भविष्यात कोर्ले सातंडी धरणावरून शहराला पाणी देण्याचा विचार व्हावा, असे सांगितले. मुख्याधिकारी पाटील यांनी शहराच्या पाणी प्रश्‍नाच्या अनुषंगाने योजना दुरुस्ती कामाकडे लक्ष दिले जाईल, असे सांगितले. ऋत्विक धुरी यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक शरद ठुकरुल यांनी आभार मानले. यावेळी भाजपच्या देवगड आणि विजयदुर्ग मंडल अध्यक्षांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरसेवक आणि नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
........................
रक्तदान शिबिराला जामसंडेत प्रतिसाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप देवगड मंडलाच्या वतीने जामसंडे येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३६ दात्यांनी रक्तदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com