खेड पालिकेतर्फे वनमहोत्सव
संजीवनीचे रशियात
नृत्यपथकाचे नेतृत्व
खेड ः महाराष्ट्रातील कला आणि संस्कृती समृद्ध वैविध्यपूर्ण आहे. याच महाराष्ट्रातील कलापरंपरेची रशियात मोहोर उमटवण्याची किमया तालुक्यातील किंजळे येथील रहिवासी संजीवनी सुतार या कोकणकन्येने केले. रशियात-मॉस्को येथे महाराष्ट्र राज्याचे पथकाचे नेतृत्व करत देशवासीयांची मान उंचावली. संजीवनीची २६ जानेवारी २०२४ मध्ये दिल्ली महाराष्ट्र चित्ररथासाठी निवड झाली होती. यानंतर तिला रशियातील मॉस्को येथे महाराष्ट्रातील आध्यात्मिक शिवकालीन इतिहास व परंपरेच्या नृत्याविष्कारातून कलाविष्कार सादर करण्याची संधी प्राप्त झाली. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने पुरस्कृत केला होता. येथे तिने महाराष्ट्राला लाभलेल्या लोककलेच्या समृद्ध परंपरेचे पैलू सादर करत तेथील रसिकांची मने जिंकली.
खेड पालिकेतर्फे
वनमहोत्सव
खेड ः खेड शहरात वृक्ष लागवडीसह संगोपन उपक्रमासाठी नगरपालिकेने १५ जूनपासून मोहीम हाती घेतली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत वनमहोत्सव उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून वृक्ष लागवड आणि संगोपन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे. पालिका हद्दीतील मोकळ्या जागा, उद्याने, आरक्षित क्षेत्रे, रस्त्याच्या दुतर्फा, नदीकिनारी, राखीव क्षेत्रे, स्मशानभूमी, शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, महिला बचतगट यांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे.
जळितग्रस्तांना जिल्हा बँकेचा मदतीचा हात
जळीतग्रस्तांना
जिल्हा बँकेची मदत
खेड ः तालुक्यातील खोपी-ढेबेवाडी येथे लागलेल्या आगीत तीन घरे खाक होऊन कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले होते. या तिन्ही कुटुंबांना धर्मादाय निधीतून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेने आर्थिक मदतीचा हात दिला. दोन महिन्यांपूर्वी रंजना ढेबे, लक्ष्मी ढेबे, पार्वती ढेबे यांची घरे जळून भस्मसात झाली होती. या तिन्ही कुटुंबीयांनी जिल्हा बँकेकडे आर्थिक मदतीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक दिनकर मोहिते यांच्या हस्ते तिन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. या वेळी बॅंकेचे सरव्यवस्थापक सुनील निकम, सुनील शिर्के उपस्थित होते.
‘डोअर टू डोअर’
खेडमध्ये सर्वेक्षण
खेड ः पावसाळ्यात कीटकजन्य व साथीचे आजार रोखण्यासाठी तालुका आरोग्य विभागासह नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. विविध आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ''डोअर टू डोअर'' सर्वेक्षण करण्यात येत आहे. या पाठोपाठ मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ''सफाई अपनाओ बिमारी भगाओ'' अभियान प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात येत आहे. शहरात डेंगी, मलेरिया आजाराबाबत नागरिकांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती करून साथ फैलावणार नाही, याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी संपूर्ण शहरात ''डोअर टू डोअर'' सर्वेक्षण करत आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत नागरिकांना सूचित करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.