रत्नागिरी-जिल्हा कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी भाई विलणकर

रत्नागिरी-जिल्हा कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी भाई विलणकर

Published on

rat22p29.jpg-
79217
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या भाई विलणकर यांचे अभिनंदन करताना संघटनेचे सदस्य.
--------------
जिल्हा कुस्ती संघटनेच्या
अध्यक्षपदी भाई विलणकर
उपाध्यक्षपदी आनंद तापेकर, अमित विलणकर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ः रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५ ते २०३० या आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड आज जाहीर करण्यात आली. या निवडीमध्ये श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर यांची अध्यक्षपदी तर डॉ. चंद्रशेखर केळकर यांची कार्याध्यक्षपदी निवड केली आहे.
जिल्ह्यातील कुस्ती खेळाला नवी दिशा देण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी कार्य करेल, अशी अपेक्षा आहे. निवडीमध्ये अनुभवी आणि युवानेतृत्वाचा योग्य समन्वय साधण्यात आला आहे. नवीन कार्यकारिणी अशीः अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर, कार्याध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, उपाध्यक्ष अमित विलणकर, आनंद तापेकर, प्रमुख कार्यवाह सदानंद जोशी, सहकार्यवाह योगेश हरचेकर, वैभव चव्हाण; खजिनदार अंकुश कांबळे, कार्यकारिणी सदस्य संतोष कदम, सौरभ मलुष्टे, फैय्याज खतीब, राजेंद्र नेवरेकर, आनंदा सनगरे, स्वप्नील घडशी, आनंद दुधाळ, संतोष गोसावी, प्रसाद करमरकर, निलम कुळकर्णी तर निमंत्रित सदस्य संदेश चव्हाण, अभिषेक पवार, दिलीप कारेकर, मानसिंग पवार, रवींद्र वासुरकर, सुयोग कासार, ऋषिकेश शिवगण, संदीप गुरव, कमल नितोरे; सल्लागार प्रसाद गवाणकर, श्रीकांत वैद्य, दिनकर पवार, अमित नेवरेकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com