राजीवड्यातील ''बांगलादेश'' झोपडपट्टी नाव हटवा
-rat२२p३३.jpg-
25N79269
रत्नागिरी ः राजिवडा येथील बांगलादेश झोपडपट्टी हे नाव हटवा, या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.
----
‘बांगलादेश झोपडपट्टी’ नाव हटवा
शिवसेनेची मागणी; श्रीदेव काशी विश्वेश्वर मार्ग नाव द्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : शहरातील राजिवडा पुलाखालील परिसराला अनधिकृतपणे ‘बांगलादेश झोपडपट्टी’ असे संबोधले जाणे निषेधार्ह आहे. हे नाव दैनंदिन व्यवहारात वापरले जाऊ नये. ते बदलून या परिसराला ‘श्रीदेव काशी विश्वेश्वर मार्ग, राजिवडा’ असा अधिकृत उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन पालिका मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वापार रत्नागिरी शहरातील राजिवडा पुलाखालील परिसराला लागून असलेल्या काही परिसराचा उल्लेख ‘बांगलादेश परिसर’ किंवा ‘बांगलादेश झोपडपट्टी’ असा केला जात आहे. हे संबोधणे त्वरित थांबवण्यात यावे आणि त्या ऐवजी अधिकृत व योग्य नावाने या परिसराचा उल्लेख करण्यात यावा. रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहरामध्ये एखाद्या परिसराला अशा प्रकारे चुकीच्या नावाने संबोधणे योग्य नाही. गिरोबा तळव्याजवळील तेलीआळी येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर मंदिर आणि राजिवडा परिसराला ''श्रीदेव काशी विश्वेश्वर मार्ग, राजिवडा'' असा अधिकृत उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महेश म्हाप, बिपिन बंदरकर, बंड्या साळवी, सुदेश मायेकर, सुहेल मुकादम, विकास पाटील, संजय साळवी, विजय खडेकर आणि संजय हेळेणकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.