पेढांबेत बचत गटाकडून वृक्ष लागवड
- rat२३p३.jpg-
P२५N७९३४०
चिपळूण ः पेढांबे येथे वृक्षारोपण करताना संकल्प ग्रामसंघाच्या महिला.
पेढांबेत बचतगटाकडून १०० रोपांची लागवड
ग्रामपंचायतीचा पुढाकार; रस्त्याच्या दुतर्फा मोहीम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः तालुक्यातील पेढांबे येथे वृक्ष लागवडीसाठी बचतगटाच्या महिला सरसावल्या आहेत. यामध्ये १०० देशी प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. ग्रामपंचायत पेढांबे, अर्थ फाउंडेशन चिपळूण व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पेढांबे ग्रामपंचायत ते सुकाईदेवी मंदिर रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी अर्थ फाउंडेशमार्फत १०० रोपे उपलब्ध करून देण्यात आली होती. तालुक्यातील पेढांबे येथे सोमवारी (ता. २१) दुपारी २ वाजता हा कार्यक्रम झाला. या वेळी संकल्प ग्रामसंघाच्या सर्व महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी अर्थ फाउंडेशनचे सदस्य व कृषी अधिकारी मनोज गांधी, कृषी विस्तार अधिकारी अमोल पाटील यांनी बचतगटाच्या महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी बचतगटाची उद्दिष्टे, ध्येय व आर्थिक सबलता या सोबतच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्व, यातील महिलांची भूमिका या विषयी सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम झाल्यानंतर पेढांबे ग्रामपंचायत ते सुकाईदेवी मंदिर मार्गावर वड, पिंपळ, उंबर, भेडा, जांभूळ, जरूळ व अर्जुन अशा देशी प्रजातींच्या १०० रोपांची लागवड करण्यात आली. ग्रामसंघाच्या अध्यक्षा रजनी कदम यांनी आपल्या सर्व महिला सहकाऱ्यांच्यावतीने या रोपांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली. अर्थ फाउंडेशनचे मंदार चिपळूणकर यांनी चांगल्याप्रकारे वृक्षाची जोपासना व वाढ करणाऱ्या महिला भगिनीला एक छोटे भांडे पुढील वर्षी भेट देणार असल्याचे सांगितले. या वेळी लावलेली झाडे संगोपन करून वाढवण्याचा निर्धार बचतगटाच्या सर्व महिलांनी केला.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कदम, विलास तांदळे, शामल शिंदे, गौरी शिंदे, शामल कदम, सुवर्णा केंबळे, सुषमा खांबे, मनीषा खांबे, शुभ्रा खेडेकर, उत्पादक गट अध्यक्षा एकता पेढांबकर, संतोष खांबे, शरयू शिंदे, काशिनाथ तांदळे, संतोष शिंदे, संग्राम चाळके आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.