पर्यटन व्यवसायात कोकणातील महिलांना अधिक संधी

पर्यटन व्यवसायात कोकणातील महिलांना अधिक संधी

Published on

rat२३p४.jpg-
२५N७९३४१
रत्नागिरी : बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आयोजित पर्यटन कार्यशाळेत दीपप्रज्वलन करताना वैभव सरदेसाई. सोबत स्वरूपा सरदेसाई, डॉ. मीनल ओक आणि मकरंद केसरकर.

पर्यटन व्यवसायात कोकणातील महिलांना संधी
डॉ. मीनल ओक ः ‘बीकेव्हीटीआय’तर्फे मोफत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : कोकणवासीयांना पर्यटन शिक्षणात मोठी संधी उपलब्ध आहे. या माध्यमातून महिलांना पर्यटनक्षेत्रात स्थिर व यशस्वी करिअर घडवता येईल त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी पर्यटन उद्योगात यावे, असे आवाहन ओक्स अॅकॅडमीच्या संचालिका तथा परशुराम शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. मीनल ओक यांनी केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने (बीकेव्हीटीआय) आयोजित केलेल्या पर्यटनातील करिअर संधीविषयी मोफत शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विवा एक्झिक्युटिव्ह हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
कोकणातील पर्यटनाची ओळख या विषयावर प्राचीन कोकणचे संचालक वैभव सरदेसाई यांनी स्थानिक पर्यटनस्थळांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. गोष्टीरूप उदाहरणे देत कोकणातील पर्यटनाची पार्श्वभूमी उलगडली.
पर्यटनक्षेत्रातील व्यवसाय व रोजगार संधी या विषयावर लॅटरल कन्सेप्टचे भागीदार व वास्तुविशारद मकरंद केसरकर यांनी महिला उद्योजकतेच्या संधी, स्टार्टअप कल्पना व फील्ड अनुभव शेअर केले. पर्यटन व्यवसायातील रोजगार संधींवर प्रकाश टाकला. बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या पर्यटन अभ्यासक्रमाची माहिती समन्वयक प्रा. सोनिया मापुस्कर यांनी दिली.
संस्थेचे प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी प्रकल्पप्रमुख मंदार सावंत देसाई, स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्या स्वरूपा सरदेसाई, हॉटेल इंडस्ट्रीमधील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सिद्धी करंदीकर यांनी केले. कार्यक्रम समन्वयक साधना ठाकूर यांनी आभार मानले.
---
कोट
या कार्यशाळेला विद्यार्थिनी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यटनक्षेत्रात नवे करिअर घडवण्याची प्रेरणा व दिशा या कार्यक्रमातून उपस्थितांना मिळाली. कोकणात पर्यटनक्षेत्रात महिलांसाठी नव्या संधींचे दालन खुले होत आहे. कोकणातील महिलांना पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रात समावेशक संधी देणे, मार्गदर्शन व प्रशिक्षणाद्वारे सक्षम करणे हा बाया कर्वे व्होकेशनल इन्स्टिट्यूटचा प्रमुख उद्देश आहे.
- स्वरूपा सरदेसाई.
सदस्य, महर्षी कर्वे संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com