आंबा प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रयत्न

आंबा प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रयत्न

Published on

79385

आंबा प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रयत्न

नितीन मांजरेकर; वेंगुर्लेत ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन’ची बैठक

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २३ ः तालुक्यात आंबा हे प्रमुख पीक आहे. तालुक्याची अर्थव्यवस्था आंबा पिकावर अवलंबून आहे. अलीकडच्या १०-१५ वर्षांत आंबा पिकाला वारंवार बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. हवा तसा दरही मिळत नाही. त्यामुळे येथे पिकणाऱ्या आंब्यापासून विविध प्रकारची उत्पादने घेता यावीत, यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मोठा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) नूतन वेंगुर्ले तालुकाध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वेंगुर्ले तालुकाध्यक्षपदी आडेली येथील आंबा बागायतदार तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मांजरेकर यांची निवड करण्यात आली. मंगळवारी (ता. २२) झालेल्या आत्मा समितीच्या बैठकीत ही बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी मांजरेकर यांचे अभिनंदन केले.
समितीचे सचिव तथा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम यांनी प्रास्ताविक केले. आत्मा समिती वेंगुर्लेचे मावळते अध्यक्ष तथा पेंडूर गावचे प्रगतशील शेतकरी गुंडू उर्फ देवा कांबळी, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, आत्माचे सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख बुधाजी उर्फ उमेश येरम, प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण गाडगीळ, दिलीप मठकर, संजना परब, आकांक्षा मांजरेकर, सागर गडेकर, संध्या राणे, सुजाता देसाई, महेश सामंत, सुहासिनी वैद्य, कीर्तीमंगल भगत, युवराज ठाकूर, संजय गावडे, सुधीर आरोलकर आदी यावेळी उपस्थित होते. मंगेश चव्हाण यांनी आत्माच्या माध्यमातून तालुक्यातील कृषी क्षेत्र कसे प्रगत करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. वालावलकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष मांजरेकर यांना शुभेच्छा दिल्या. मंत्रालय पातळीवर कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यासाठी आपले संपूर्ण सहकार्य लाभेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सभेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com