जनतेच्या विश्वासावर विजय निश्चित

जनतेच्या विश्वासावर विजय निश्चित

Published on

79420

जनतेच्या विश्वासावर विजय निश्चित

धोंडी चिंदरकर ः मालवणात भाजप प्रवेशकर्त्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ ः संघटक, सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्ता ही भाजपाची ताकद आहे. मालवणात भाजपाची ताकद वाढत असून भाजपा विरोधात सगळे पक्ष जरी एकत्र आले तरीही भाजपाचा पराभव करू शकत नाहीत. कारण कार्यकर्त्यांचे बळ आणि जनतेचा विश्वास यावर भाजपचा विजय निश्चित होतो, असा विश्वास भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश भाजप कार्यालय येथे ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दर्शना कासवकर, सेजल परब, सन्मेष परब, भाई कासवकर आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सर्वांचा मालवण शहर व तालुका भाजपतर्फे स्वागत सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हा सत्कार झाला.
श्री. चिंदरकर म्हणाले, ‘भाजप संघटन मजबूत होत असताना होऊ घातलेल्या आगामी निवडणुका लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ जो निर्णय देतील त्यानुसार कार्यरत राहू. सध्यस्थितीत जागा वाटप किंवा उमेदवार निश्चिती झाली नाही. सर्व निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील. मात्र, भाजप म्हणून निश्चितच आमची ताकद वाढली आहे.’
यावेळी पक्ष संघटना, पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत विलास हडकर यांनी मार्गदर्शन केले. तर जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सुदेश आचरेकर यांनीही विचार मांडले. यावेळी मंदार केणी, यतीन खोत व सहकारी यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. भाजपा पक्षात प्रवेश केल्यानंतर आम्हाला जो मान सन्मान मिळाला, त्याबद्दल आम्ही कायम ऋणी राहू. वरिष्ठ जी जबाबदारी देतील ती पार पाडली जाईल. विकास आणि हिंदुत्व यावर काम करणारा भाजप पक्ष आणि संघटनात्मक असलेले सूक्ष्म नियोजन पाहता भाजपचा विजय आगामी निवडणुकात निश्चित आहे, असेही त्यांनी सांगितले. भाई कासवकर यांनी आता यापुढे कोणत्याही पक्षात प्रवेश नाही. भाजपच हा शेवटचा पक्ष आहे. यापुढे सर्वकाही भाजपसाठीच असल्याचे सांगितले. सेजल परब यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राणे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. शहरात भाजपची ताकद वाढली आहे. मागील टर्ममध्ये नगरसेवक म्हणून असलेले १४ जण आता भाजपसोबत आहेत. आगामी वीसही नगरसेवक विजयी होतील, अशी स्थिती आहे. मात्र, याबाबत आगामी निवडणुकीचे सर्व निर्णय वरिष्ठ घेतील. असेही शहराध्यक्ष मोंडकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com