विकासासह संघटनात्मक कामाला अग्रक्रम
-rat२३p१०.jpg -
P२५N७९३५६
मंडणगड ः धुत्रोली येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार विनय नातू आदी.
---
विकासासह संघटनात्मक कामाला अग्रक्रम
सतीश मोरे ः भविष्याचा वेध घेऊन नेतृत्व युवावर्गाकडे
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २३ ः विकासात्मक व संघटनात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर पार्टीचे काम वाढवण्यासाठी अग्रक्रम देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना भाजप सामोरे जाणार आहे, अशी माहिती उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी मंडणगड येथे पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुत्रोली येथील शिवस्मारक भवन येथे आयोजित मेळाव्याला ते उपस्थित होते. या निमित्ताने त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार विनय नातू, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी तालुकाध्यक्ष अप्पा मोरे आदी उपस्थित होते. मोरे म्हणाले, केंद्र व राज्यशासनाच्या एकाच पक्षाच्या सत्तेचा उपयोग कोकणच्या विकासासाठी करून घेण्याचा प्रयत्न आहे. रखडलेली कामे व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुतीत योग्य समन्वय साधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जायचे आहे. पक्ष त्याबाबत निर्णय घेईल. त्यासाठी संघटना मजबूत करण्याबरोबरच विकासकामांचा समतोल राखण्याचा पार्टीचा प्रयत्न आहे. तालुकास्तरापासून पार्टीची धुरा युवानेतृत्वाकडे भविष्यातील पक्षाची वाटचाल लक्षात घेऊनच देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.