-सर्व पक्षांना स्वबळाची खुमखुमी

-सर्व पक्षांना स्वबळाची खुमखुमी

Published on

चिपळूण नगरपालिका-------लोगो
सर्व पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता
चुरस वाढणार ; महायुतीतील संबंध ताणलेले
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ : तालुक्यात महायुतीतील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. पालिका निवडणुकीसाठी कोणताही पक्ष आघाडी किंवा युती करण्यास तयार नाही. प्रत्येकाला आपली ताकद वाढवायची असल्यामुळे चिपळूण पालिकेची निवडणूक सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जुन्या प्रभागांचे विभाजन होऊन नवी प्रारूप प्रभाग रचना तयार केली जाणार असल्याने नव्या प्रभाग रचनेमध्ये जुन्या प्रभागातील मतदारांची अदलाबदल होऊन त्यातून, नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार आहेत. नगरसेवकांची संख्या दोनने वाढणार असल्यामुळे त्यावर इच्छुकांचे बारीक लक्ष आहे. २०२१ पासून रखडलेल्या या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्यास विरोध दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपने शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) व काँग्रेस, मनसेतील मंडळींना गळाला लावण्याची चढाओढ सुरू केली आहे. यामध्ये प्रथमदर्शनी शिंदे गटाने बाजी मारल्याचे दिसते. शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणमध्ये लक्ष केंद्रित केले आहे. विरोधी पक्षातील कार्यकर्ते, अनेक पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांकडून रसद दिली जात आहे. भाजपनेही शांततेत आपले ‘ऑपरेशन’ सुरू केल्याची चर्चा आहे. त्यासाठी संघाची मोठी फळी कामालाही लागली आहे.
पालिकेची अखेरची निवडणूक २०१६ मध्ये झाली. या निवडणुकीत सर्वप्रथमच शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत रंगली. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही स्वतंत्र उमेदवार दिला होता. अटीतटीच्या या निवडणुकीत भाजपचे पाच नगरसेवक आणि जनतेतून नगराध्यक्ष निवडून आला. शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला; परंतु शिवसेनेला बाहेर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली होती. मध्यंतरी कोकणचे सत्ताकारणच बदललल्याने त्याचा प्रभाव निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये जे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते तेच महायुती म्हणून निर्णयप्रक्रियेत पुढे असतील. त्यामुळे महायुती झाली तर जागावाटपासाठी मागील राजकीय शत्रूंना एकमेकांची तोंडे बघावी लागणार आहेत. यातील काहींना स्वतःचे अस्तित्व राखायचे आहे तर काहींना पक्ष वाढवायचा आहे.

चौकट
२०१६ ची प्रभाग रचना
प्रभाग*१३
नगरसेवक* २६
स्वीकृत* ३
---
अशी असेल २०२५ ची प्रभाग रचना ः
प्रभाग* १४
नगरसेवक* २८
स्वीकृत* ५

चौकट
२०१६ मध्ये असे होते राजकीय बलाबल
शिवसेना* ११
काँग्रेस* ५
भाजप* ४
राष्ट्रवादी काँग्रेस* ४
अपक्ष* २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com