ःसाडेतीन हजार राख्या जवानांना रवाना
-ratchl२३२.jpg-
OP२५N७९४०९
चिपळूण ः एक राखी जवानांसाठी उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी व सामाजिक विकास ग्रुपचे पदाधिकारी.
----
जवानांना साडेतीन हजार राख्या रवाना
आकलेतील सामाजिक विकास ग्रुप; शाळांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना वाढीस लागण्यासाठी भारतीय जवानांना रक्षाबंधनानिमित्ताने राख्या पाठवण्यात आल्या. आकले येथील समाजसेवक विनेश मोहिते यांनी सामाजिक विकास ग्रुपच्या माध्यमातून ३५६० राख्या सीमेवरील अनेक भागात सैनिकांसाठी पाठवल्या आहेत.
भारतीय जवानांना रक्षाबंधनला आपल्या मायभूमीत आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेता येत नाही, या विचाराने प्रेरित होऊन विनेश भाऊ मोहिते (सामाजिक विकास ग्रुप) यांच्या प्रेरणेने भारतीय जवानांना राखी पाठवण्याचा कार्यक्रम उत्साहात तालुक्यामध्ये साजरा करण्यात आला. तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यातून बचतगट कार्यालय तिवडी, ग्रामपंचायत आकले, ग्रामपंचायत खडपोली, न्यू इंग्लिश स्कूल खडपोली, युनायटेड स्कूल चिपळूण, मिरजोळी प्राथमिक शाळा या सहा ठिकाणी राबवण्यात आला. यात सहभागी झालेल्यांना सामाजिक विकास ग्रुपकडून २०० अभिनंदन पत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी सैनिक संभाजी चव्हाण, सैनिक इक्बाल चिपळूणकर, साद कडवेकर, राजेश कोकरे, प्रसाद वनगे, सुधीर मोरे, नितीन शिगवण, हेमंत जाधव, वैभव मोहिते, सचिन पवार, समीर कदम, अनिल पिनगे, विवेक जाधव, आकाश मोहिते, राहुल मोरे, राहुल कदम, राजेश यादव, पंचशील अध्यक्ष विशाल मोहिते यांनी योगदान दिले. या राख्या देशाच्या मिशनवरील जवानांसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.