यश, नेहा, वल्लरीची चमकदार कामगिरी

यश, नेहा, वल्लरीची चमकदार कामगिरी

Published on

-rat२३p२२.jpg-
P२५N७९४०८
रत्नागिरी ः जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी, उपविजयी खेळाडू आणि बॅडमिंटन असोसिएशनचे पदाधिकारी.
-----
यश, नेहा, वल्लरीचे निवड चाचणीत यश
जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा; १३० खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृ्त्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनमार्फत आयोजित जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी स्पर्धेत यश भोंगले, नेहा मुळ्ये आणि वल्लरी देवस्थळी यांनी विविध तीन गटांचे विजेतेपद मिळवत हॅट्ट्रिक साधली आहे.
रत्नागिरीतील सर्वंकष विद्यामंदिरच्या बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या या स्पर्धेसाठी रायसोनी स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी साह्य केले होते. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी रायसोनी यांच्याशी संवाद साधला होता. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे १३० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष ओंकार हजारे, वस्तू व सेवाकर कमिशनर विकास पोवार, अमित मुळ्ये, सरोज सावंत, राजेश आराध्यमठ, मंगेश प्रभुदेसाई, रजनीश महागावकर, विनीत पाटील, सुधीर बाष्टे आदी उपस्थित होते. स्पर्धेतून रत्नागिरी जिल्हासंघांची निवड करण्यात येणार आहे. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस, चषक आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (वियजी, उपविजयी ४० वर्षावरील दुहेरी निशिकांत मेहंदळे-संदेश कलगुटकर (विजयी) विरुद्ध दिनेश जैन-निनाद लुब्री. १९ वर्षाखालील मुली ः नेहा मुळ्ये, आर्या यशवंतराव, मुलगे ः यश भोंगले, स्वयम पानवलकर. १७ वर्षाखालील मुली ः नेहा मुळ्ये, आर्या यशवंतराव. मुलगे ः यश भोंगले, सुमेध सुर्वे. १५ वर्षाखालील मुली ः वल्लरी देवस्थळी, रिया पेढांबकर. मुलगे ः अंश ढेकणे, पार्थ आपटे. १३ वर्षाखालील मुली ः वल्लरी देवस्थळी, विश्वास गमरे. मुलगे ः आदित्य घाणेकर, अनय भोजने. ११ वर्षाखालील मुली ः वल्लरी देवस्थळी, स्वरा खेडकेर. मुलगे ः लवीन चोचे, अभिराज पवार. पुरुष दुहेरी ः रोमित कलगुटकर-रूद्रा सदावर्ते, सिद्धेश फणसेकर-यश सावर्डेकर. महिला एकेरी ः नेहा मुळ्ये, ऐश्वर्या मोहिते. पुरुष एकेरी ः यश भोंगले, सिद्धार्थ मोहिते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com