रत्नागिरी शनिवारी एकदिवशीय नामगजर
rat२३p७.jpg-
P२५N७९३४४
मंदिरातील श्री हनुमान मूर्ती.
-----
हनुमान मंदिरात
शनिवारी नामगजर
रत्नागिरी ः शहरातील मारुती आळी येथील सुप्रसिद्ध प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये शनिवारी (ता. २६) श्रावण मासातील पहिल्या शनिवारी नामगजर एक्क्याचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे ६ वा. पूजाअर्चा व सकाळी ७:५० वा. आरती होईल. ८ ते १० श्री हनुमान भजन मंडळ मारुती आळी, १० ते १२ श्री जय भैरव भजन मंडळ, मांडवी, दुपारी १२ ते २ श्री लक्ष्मीकांत रवळनाथ भजन मंडळ भाट्ये, २ ते ४ श्री साईबाबा भजन मंडळ मुरूगवाडा, सायं. ४ ते ६ श्री लक्ष्मीकांत महिला भजन मंडळ भाट्ये, ६ ते ८ श्री बाळ हनुमान मित्रमंडळ खडपेवठार, रात्री ८ ते १० सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ वांद्री, १० ते १२ श्री भैरव प्रासादिक भजन मंडळ मुरूगवाडा यांची सुश्राव्य भजने होतील नंतर आरती होईल. वरील कार्यक्रमांचा सर्व भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा व श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मारुती आळी संस्थेने केले आहे.
संस्कृत उपकेंद्रात
योग अभ्यासक्रम
रत्नागिरी ः शहरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) अंतर्गत भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्यावतीने संस्कृत सप्ताह साजरा होत आहे. या निमित्ताने निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन १ ते १५ ऑगस्टदरम्यान दररोज सायंकाळी ५.३० वाजता केले आहे. हा अभ्यासक्रम भारतरत्न डॉ. पां. वा. काणे, रत्नागिरी उपकेंद्र, अरिहंत मॉल, एसटी स्टँडसमोर, रत्नागिरी येथे होणार आहे. यात योग शिकवला जाणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी प्रा. अक्षय माळी यांच्याशी संपर्क साधावा. हा अभ्यासक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य असून, योगविषयक रस असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि खासकरून महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.
करंजाळी विद्यालयात
गुणवंतांचा गौरव
गावतळे ः दापोली तालुक्यातील करंजाळी न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी प्रवीण शिंदे, फणसू सरपंच रेखा टेमकर, पोलिसपाटील शामल गायकर, दत्तात्रय सोमण, दशरथ बुरटे, प्रकाश मळेकर उपस्थित होते. करंजाळी व पावनल ग्रुपग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वैभव विटमल यांनी शाळेपुढे असलेल्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने विद्यालयाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आळतेकर यांच्या प्रयत्नातून ऋतुजा दणदणे, जुई रामाणे, संस्कृती मांजरेकर, तन्वी कोळंबे, सानिया बोहिरे, दक्षता तांबडकर या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.