कोकण
राजापुरात देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा
राजापुरात गीतगायन स्पर्धा
राजापूर, ता. २३ ः ७९व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित आणि भाजप पुरस्कृत तालुक्यातील सर्व कराओके गायकांसाठी खुली देशभक्तिपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी (ता. १५ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी इच्छुकांनी ३० जुलैपर्यंत नावनोंदणी करावी. त्यासाठी संदीप देसाई, महेश मयेकर, मोहन घुमे, प्रसन्न देवस्थळी यांच्याशी संपर्क साधावा.