-सर्व यंत्रणा समन्वयाने आपुलकीने काम करेल

-सर्व यंत्रणा समन्वयाने आपुलकीने काम करेल

Published on

-rat२३p२६.jpg-
२५N७९४३०
रत्नागिरी ः येथील नागरी बेघर निवाराकेंद्राला भेट देणारी राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीमधील पदाधिकारी.
-------------
सर्व यंत्रणा समन्वयाने काम करेल
उज्ज्वल उके ः नागरी बेघर निवारा केंद्राची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः जिल्हास्तरीय सर्व यंत्रणा बेघर निवारा केंद्रासाठी, बेघरांसाठी समन्वयाने, आपुलकीने निश्चितच काम करेल, असा विश्वास राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष उज्ज्वल उके यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी नगरपालिका संचलित आठवडा बाजारमधील नवीन आधार नागरी बेघर निवारा केंद्राला राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीने भेटीनंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सदस्य प्रमिला जरग, महेश कांबळे, सहआयुक्त शंकर गोरे, राज्य अभियान व्यवस्थापक प्रसाद राजेभोसले, रवींद्र जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, मुख्याधिकारी वैभव गारवे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर, आधार शहरस्तर समितीच्या अध्यक्ष जान्हवी जाधव आदी उपस्थित होते.
या प्रसंगी उके म्हणाले, नागरी बेघर निवारा केंद्राची इमारत अत्यंत चांगली आहे, ती अशीच ठेवावी त्यासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार देखभाल करावी. या प्रसंगी सहआयुक्त गोरे यांनी समितीच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यात १०० नागरी बेघर निवारा केंद्रे उभी राहिली आहेत. १४ लहान मुलांसाठी बेघर निवारा झाली आहेत. यामधून केवळ निवारा न देता त्यांचे जीवनमान चांगले व्हावे, हा सर्वोच्च न्यायालयाचा उद्देश असल्याने समितीमार्फत तसे कामकाज केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com