देवगडमध्ये मुसळधार सुरूच

देवगडमध्ये मुसळधार सुरूच

Published on

79462

देवगडमध्ये मुसळधार सुरूच

किनाऱ्याला झोडपले; दाभोळेत गोठ्याचे ४० हजारांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ : तालुक्याच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासह पावसाची धुवाँधार सुरूच आहे. जोरदार सरींनी किनारी भागाला चांगलेच झोडपून काढले आहे. सततचा पाऊस आणि वादळी वारा यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी नुकसानही सुरू आहे. तालुक्यातील दाभोळे येथील एका गोठ्याच्या (मांगर) छप्पराचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले. नुकसानीची महसूल यंत्रणेने माहिती घेतली. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत आज सकाळपर्यंत येथे ९२ मिलीमीटर इतका पाऊस झाला. यंदाच्या हंगामात पावसाने १९२४ मिलीमीटर इतकी आकडेवारी पूर्ण केली आहे.
रविवारी (ता. २०) सायंकाळपासून पावसाने किनारी भागात जोर धरला आहे. सोमवारी आणि मंगळवारीही पावसाने चांगलेच झोडपून काढले. किनारी भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. आजही पहाटे पावसाने चांगलेच झोडपले. पाऊस आणि वादळी वारा यामुळे तालुक्यातील दाभोळे येथील एका गोठ्याच्या छप्पराचे नुकसान झाले. महसूल यंत्रणेने नुकसानीचा पंचनामा केला. सतत पाऊस पडत असल्याने अनेकांची धावपळ उडाली. आज दिवसभरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सायंकाळीही जोरदार पाऊस झाला. आतापर्यंत तालुक्यात १९२४ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
----
दृष्टिक्षेपात
- किनारी भागात पावसाच्या जोरदार सरी
- वादळी वाऱ्यामुळे नुकसान सत्र
- चोवीस तासांत ९२ मिलीमीटर इतका पाऊस
- आतापर्यंत तालुक्यात १९२४ मिलीमीटर पाऊस
- महसूल यंत्रणेकडून नुकसानीचा पंचनामा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com