पारंपरिक उद्योगातून स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न होईल साकार
-rat२३p१२.jpg-
२५N७९३५८
रत्नागिरी : जनशिक्षण संस्थानमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी कौशल्य आणि रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या साहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांचे स्वागत करताना संचालिका निधी सावंत.
-------
पारंपरिक उद्योगातून स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न साकार होईल
इनुजा शेख ः जनशिक्षण संस्थानमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासामध्ये पारंपरिक शिल्पकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या शिल्पकारांना आधुनिक युगानुसार सक्षम केले आणि तरुण या पारंपरिक उद्योगधंद्यांकडे वळला तर स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न लवकरच साकार होईल, असे प्रतिपादन कौशल्य आणि रोजगार मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीच्या साहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले.
येथील जनशिक्षण संस्थानमध्ये केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा उद्देश पारंपरिक कारागिरांना आणि शिल्पकारांना आर्थिक, तांत्रिक आणि विपणन साहाय्य देऊन त्यांना स्वावलंबी बनवावे आणि पारंपरिक कौशल्य लोप पावत आहेत, त्यांची जपणूक करणे हा आहे. याकरिताच माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून व उमा प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. विनय नातू यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत जनशिक्षण संस्थेत या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
जनशिक्षण संस्थानच्या संचालिका निधी सावंत यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत पाचदिवसीय प्रशिक्षण आयोजित केले आहे आणि जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रशिक्षणामध्ये मुख्य प्रशिक्षिका श्रीदुला कांबळे यांनी लाभार्थ्यांना नवीन उपकरणांचा उपयोग, बाजारसंपर्क, संवादकौशल्य, डिजिटल मार्केटिंग, सायबर क्राईम आदी विषयांवर व्यावहारिक प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान खादी ग्रामउद्योग अधिकारी इंदुलकर यांनी मार्गदर्शन केले. उद्योजकता विकासावर प्रशांत सोळंकी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनशिक्षण संस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.